Carnival in Goa: 'खा, प्या, मजा करा'! गोव्याच्या प्रसिद्ध महोत्सवाला लवकरच होणार सुरुवात

गोव्याचा कार्निव्हल यंदा 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असे चार दिवस साजरा होणार आहे.
Carnival
CarnivalDainik Gomantak

देशी-परदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेला गोव्याचा कार्निव्हल यंदा 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असे चार दिवस साजरा होणार आहे. ख्रिश्‍चन धर्मियांचा ‘लेंट’ महिना सुरु होण्यापूर्वी काही दिवस आधी ‘खा, प्या, मजा करा’ अशा भावनेने कार्निव्हल साजरा केला जातो. ‘लेंट’च्या काळात अनेकजण उपवास करतात किंवा मांसाहार वर्ज्य करतात.

असे असले तरी रोमन मूर्तीपूजक संस्कृतीत असलेल्या सॅटर्न आणि अपोलो या देवतांच्या होणाऱ्या आवाहनािप्रत्यर्थ साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवी जल्लोषाच्या खुणा कार्निव्हलमध्ये सापडतात. अर्थात गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलचा कोणत्याही धार्मिक रिवाजांशी आता संबंध राहिलेला नाही. लोकांचा उत्साह, पर्यटन प्रसिद्धी आणि सरकारी पाठबळ या त्रिसूत्रीतून हा महोत्सव साजरा होताे.

कार्निव्हल उत्सवाला ‘फॅट सॅटर्डे’ दिवशी जल्लोषी मिरवणूकीद्वारे सुरवात होते. या मिरवणूकीचे नेतृत्व किंग मोमो करतो. कोण असतो हा किंग मोमो? किंग मोमो बनण्यासाठी पर्यटन खाते अर्ज मागवते आणि किंग मोमोला अनुरुप असलेल्या शरिरयष्टीनुसार (बहुधा धिप्पाड) आणि परिसरात असलेल्या त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज घेऊन एखाद्याची निवड करते.

हा अधिकृत किंग मोमो कार्निव्हल मिरवणूकीच्या अग्रभागी असतो. नर्तक, संगीतकार, विदूषक, कसरतपटू त्यांच्या अवतीभोवती असतात. ‘खा, प्या आणि मजा करा’ असा हुकूम तो जारी करतो आणि त्याची चार दिवसाची राजवट सुरु होते.

गोव्यात पोर्तुगीज शासनाच्या काळात चैनीला सोकावलेल्या पोर्तुगीजांनी या उत्सवाची ओळख गोव्याला करुन दिली. अर्थात त्यावेळी मिरवणूक वगैरे हा प्रकार नव्हता. इस्टाडो नोवो (नवीन राज्य) च्या रुपाने साधारण 1933 साली पोर्तुगालमध्ये उदयाला आलेल्या नवीन स्वरुपाच्या पोर्तुगीज राजवटीचे ते एक प्रकारचे उत्सवी साजरीकरण होते.

ही राजवट पुराणमतवादी, राष्ट्रवादी आणि पारंपरिक कॅथलिक धर्माचे रक्षण करणारी असली तरी तिने सिमीत प्रमाणात माध्यम आणि उच्चारण स्वातंत्र्य खुले केले होते.

Carnival
Milind Naik Sex Scandal : मिलिंद नाईक कथित बलात्कारप्रकरणाला नवे वळण! उच्च न्यायालयाने क्राईम ब्रँचला फटकारले

गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे चार वर्षांनी, म्हणजे १९६५ साली गोव्यातील काही संगीतकार आणि लोककलाकारांनी ‘रिओ कार्निव्हल’च्या धर्तीवर गोवा कार्निव्हलची रचना करुन हा उत्सव साजरा करायला प्रारंभ केला.

शहरात होणाऱ्या मिरवणूकीबरोबरच दक्षिण गोव्यात होणारे खेळ तियात्रही कार्निव्हल सादरीकरणाचा अतूट भाग बनले आहेत. आज या महोत्सवात व्यापारीकरणाने शिरकाव केलेला असला तरी अजून कार्निव्हलचे स्वरुप बहुतांशी पारंपारिकच राहिलेले आहे.

Carnival
Valpoi News: चरावणे शाळेत ‘बाजार डे’ उत्साहात

गोव्यात साजरा होणाऱ्या या कार्निव्हलने प्रभावित होऊन समुद्र किनाऱ्यावर पर्यटक म्हणून वास्तव्य करणारे परदेशी नागरीकही या दिवसात आपला कार्निव्हल साजरा करतात. त्या कार्निव्हलचे स्वरुप छोटे असले तरी पर्यटकांसाठी अलिकडच्या वर्षात ते आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. गोवा पर्यटन विभागानुसार, कार्निव्हल हा गोव्याचा सर्वात प्रसिद्ध असा महोत्सव बनला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com