Mayem News: ‘गोयंगणे’ तलावाचे भाग्य उजळणार!

बांधकामाचा शुभारंभ : मयेतील वायंगणी शेतीला मिळणार ऊर्जावस्था
Mayem News
Mayem NewsDainik Gomantak

गेल्‍या 40 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या आणि अस्तित्व संकटात आलेल्या मये येथील ‘गोयंगणे’ तळ्याचे भाग्य आता उजळणार आहे. 50 लाख रुपये खर्चून जलसंवर्धन खात्यातर्फे तळ्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते नुकताच तलावाच्या दुरुस्ती बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. या तलावाच्या पाण्यावर तेथील वायंगणी शेती कसली जाते. दरम्‍यान, कित्येक वर्षांपासून असलेली मागणी आमदार शेट यांनी पूर्ण केल्याने शेतकरी सुखावून गेला आहे.

या शुभारंभ सोहळ्यास मयेचे सरपंच दिलीप शेट, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, कार्यकारी अभियंता के. पी. नाईक, अभियंते श्री. भंडारे, श्री. पोकळे, शेतकरी सखाराम पेडणेकर, रोहिदास घाडी, रोहिदास माईणकर, भानुदास साळगावकर, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, सचिव विश्वास चोडणकर, मये पंचायतीचे पंच व ग्रामस्‍थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले.

खाणीमुळे तलावाची दयनीय अवस्‍था

गोयंगणे तलावाच्या माथ्यावर असलेल्या चौगुले कंपनीच्या खाणीमुळे या तलावाची अवस्था दयनीय झाली आहे. खंदक खूप खोलपर्यंत खोदला असल्याने तलावाच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आत ओढले जाते आणि त्यामुळे गोयंगणे तलाव ओस पडतो. कंपनीच्या खंदकात मोठे पंप लावून पाणी तळ्यात सोडण्याची कसरत दरवर्षी करावी लागते. आता तलावाच्या बांधकामाचे काम हाती घेतल्याने सर्व समस्या दूर होण्‍याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com