लसीकरणात गोवा अव्वल: 100 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस; मुख्यमंत्र्यांचा दावा
VaccinationDainIK Gomantak

लसीकरणात गोवा अव्वल: 100 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस; मुख्यमंत्र्यांचा दावा

गोव्याच्या लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी यावेळी म्हटले.

गोव्यातील 100% पात्र नागरिकांना COVID19 लसींचा पहिला डोस देण्याबद्दल मी आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गोव्याच्या लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, राज्यातील 4 लाख 75 हजार लोकांनी आतापर्यंत कोरोना (COVID-19) प्रतिबंधक लसीचे (Covid Vaccination) दोन्ही डोस घेतल्याने ते कोरोनापासून सुरक्षीत झाले आहेत. आरोग्य खात्याने जारी केलेल्या पत्रकानुसार राज्यात आत्तापर्यंत 16,37,078 एवढे लसीकरण झाले आहे. ज्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 11,62,046 इतकी आहे, तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 4,75,032 एवढी आहे. काल राज्यात 7,996 एवढे लसीकरण झाले आहे. ज्यात 1,631 लोकांनी पहिला डोस तर 6'365 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

Vaccination
Goa Vaccination: राज्यातील 4 लाख 75 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण

शिवाय, केंद्राकडून राज्याला आतापर्यंत 22,30570 लसीचे डोस मिळाले आहेत , 7,16,700 लसीचे डोस राज्यात सध्या उपलब्ध आहेत. तर राज्यात आतापर्यंत16,37,078 लोकांनी पहिला डोस तर 11,62,2046 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com