Viking Mars arrived in goa: पहिले आंतरराष्ट्रीय समुद्रपर्यटन जहाज गोव्यात दाखल

एकाचवेळी दोन जहाजे बंदरात दाखल झाल्याने हार्बर मुरगावला जत्रेचे स्वरूप
Viking Mars
Viking MarsDainik Gomantak

वास्को: पहिले आंतरराष्ट्रीय समुद्रपर्यटन जहाज "विकिंग मार्स" 621 प्रवासी आणि 422 क्रू सह गोव्यात आज दाखल झाले आहे. यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ प्रवाशांचे स्वागत केले.

(The first international cruise ship Viking Mars docked at Murgaon port)

यंदाच्या 2022-23 पर्यटन हंगामातील पहिले विदेशी पर्यटक जहाज "विकींग मार्स" आज मुरगाव बंदरात सुमारे एक हजाराहून अधिक पर्यटकांना घेऊन दाखल झाले. तर "कार्डेलिया" हे देशांतर्गत जहाजही मुरगाव बंदरात सुमारे हजार पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटन हंगामाला आज एक प्रकारे बहर आलेला आहे.

यंदाच्या समुद्र पर्यटन हंगामाला 20 सप्टेंबरपासून "कार्डेलिया एम्प्रेस" या जहाजाच्या आगमनाने सुरुवात झाली. यावर्षी एकूण 21 देशातील विदेशी पर्यटक जहाज गोव्यात मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. त्यात कार्डेलिया देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या 32 तर 16 फेन्या विदेशी जहाजांच्या असेल. एकूण 7 लाख 42 हजार देशीविदेशी पर्यटक समुद्री मार्गे गोव्यात दाखल होणार आहेत. समुद्र पर्यटनाला आरंभ झाल्याने पर्यटन व्यवसायाला उभारी येण्यास सुरुवात झाली आहे.

कोविड महामारीनंतर 2019 पासूनदेशांतर्गत समुद्र पर्यटन सुरू करत केंद्र सरकारने एका प्रकारे पर्यटन हंगामाला चालना देण्यास मदत केली होती. त्यानंतर 2021 साली 27 सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कार्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या प्रकूण 20 फे-या झाल्या होत्या. त्यानंतर 2022 साली 27 ते डिसेंबर पर्यंत कोर्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या प्रकूण 23 फेऱ्या झाल्या आहेत. या एकूण 42 फेऱ्या दरम्यान सुमारे 84 हजार पर्यटक गोव्यात दाखल झाले. सप्टेंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात कार्डेलियाच्या एकूण दहा फेऱ्या असणार आहेत.

दरम्यान कोविड महामारीनंतर कोविड काळात ब्रेक पडलेल्या विदेशी आंतरराष्ट्रीय जहाजांचे गोव्यात मुरगाव बंदरात आज पुनश्च आगमन झाले असून आज 16 नोव्हेंबर रोजी "विकींग मार्स " हे विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज 620 पर्यटक व 421 जहाजावरील कर्मचारी वर्ग (क्रू) मिळून 1100 पर्यटकांना घेऊन बंदरात दाखल झाले.

Viking Mars
Marathi Science Council Goa: 19 तारखेपासून गोव्यात मराठी विज्ञान परिषदेचे 57 वे अधिवेशन

"विकींग मार्स" या विदेशी जहाजातील पर्यटकांच्या बाबतीत कोविड संबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पर्यटकांना गोवा भ्रमंतीसाठी चालना देण्यात आली. हे विदेशी आंतरराष्ट्रीय जहाज नोर्वे या युरोप देशातून दुबईमार्गे मुंबई ते गोवा मुरगाव बंदरात आज सकाळी 620 प्रवासी व 421 या जहाजावरील कर्मचारी मिळून 1100 पर्यटकांना घेऊन दाखल झाले. नंतर सदर जहाजातील प्रवासांचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आल्यानंतर गोवा भ्रमंतीसाठी पर्यटक बसमधून नेण्यात आले.

एकूण 24 पर्यटक बसेस चा ताफा तैनात ठेवण्यात आला होता. तसेच मुरगाव बंदराच्या गेट बाहेर शेकडो पर्यटक टॅक्सी तैनात ठेवण्यात आल्या होत्या. काही पर्यटकांनी टॅक्सीतून गोवा भ्रमंती केली.

Viking Mars
Goa Enironment: काणकोणात मासळी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्‍यांचा वापर

दरम्यान मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यावेळी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी खास उपस्थित होते. तसेच महिला वर्ग आरती घेऊन ओवाळणी करत होत्या. तसेच ढोल ताशांच्या गजरातही पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता.

आज एकाचवेळी दोन पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाल्याने हार्बर मुरगाव येथे जत्रेचे स्वरूप आले होते. एक देशी तर दूसरे विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज दाखल झाले. नंतर संध्याकाळी सदर जहाजे रवाना झाली. "विकींग मार्स" हे विदेशी जहाज कोलोंबो येथे जायल रवाना झाले. एकंदरीत आज गोव्यातील पर्यटक दृष्ट्या पर्यटनाला बहर आलेला दिसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com