छप्‍पर नाही, केवळ भिंतींचा आडोसा!

जमीनदाराने आक्षेप घेतल्याने घर दुरुस्‍तीला अडचण : 35 वर्षांपासून पाणी, विजेपासून वंचित किशन राहात असलेले घर पूर्वी सरकार दप्‍तरी नोंद होते. मात्र, आता त्‍या नोंदी वगळण्‍यात आल्‍याची माहिती गडेकर (Kishan Gadekar) यांनी दिली.
छप्‍पर नाही, केवळ भिंतींचा आडोसा!
मागील 35 वर्षांपासून किशन गडेकर (Kishan Gadekar) या घरात राहतात. Dainik Gomantak

मोरजी: नानेरवाडा - पेडणे येथील किशन अनंत गडेकर यांच्‍या घराला छप्‍पर नाही, केवळ भिंतीच्‍या आडोशाला आसरा घेत कष्‍टप्रद जीवन जगावे लागत आहे. घर दुरुस्‍तीला जमीन मालकाकडून हरकत असल्‍याने गडेकर कुटुंबियांची फरफट सुरू आहे. मागील 35 वर्षांपासून किशन गडेकर (Kishan Gadekar) या घरात राहतात. त्या वेळेपासून किशन पाणी आणि वीज सुविधांपासून वंचित आहेत.

मागील 35 वर्षांपासून किशन गडेकर (Kishan Gadekar) या घरात राहतात.
रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

सरकार एका बाजूने ‘सबका साथ सबका विकास’ अशा घोषणा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूने किशन गडेकर यांच्या घरापर्यंत वाट, रस्ता, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा पोहोचल्‍याच नाहीत. किशन गडेकर हे मागच्या 35 वर्षांपासून या घरात राहतात. त्यांचे आई - वडिलांचे निधन झाले आहे. आपले घर कुणीतरी पाडेल म्‍हणून कामासाठीही कुठे जाता येत नाही. एवढी वर्षे जतन केलेले घर जमीनदार हिरावून नेईल, अशी भीती मनात कायम असल्‍याचेही किशन गडेकर यांनी सांगितले.

मागील 35 वर्षांपासून किशन गडेकर (Kishan Gadekar) या घरात राहतात.
खरपाल-म्हापसा मार्गावर लाडफेमार्गे 'कदंब' ची बससेवा सुरु

घर सोडण्‍याचा तगादा

किशन राहात असलेले घर पूर्वी सरकार दप्‍तरी नोंद होते. मात्र, आता त्‍या नोंदी वगळण्‍यात आल्‍याची माहिती गडेकर यांनी दिली. आपले घर आहे, ती जागा जमीनदाराने आपल्याला काहीच कल्पना न देता घरासहित जमीन विकली आहे. जमीनमालकांचे वारसदार सध्या आपल्याकडे येऊन घर सोडण्‍याचा तगादा लावत आहेत. ‘घर सोडा, आम्ही पन्नास हजार रुपये रोख एका वकिलकडे देतो, ते घ्या. तसेच इतरत्र घर बांधून देतो, असे तोंडी सांगतात. मात्र, लेखी काहीही देत नाहीत. मी काय करू, असा प्रश्न किशन यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने आधार द्यावा

सध्या आपल्याला काहीच सुरक्षा नाही. त्यामुळे आपण 10 ते 12 कुत्रे पाळले आहेत. घराच्या केवळ चार भिंती उभ्या आहेत. छपराचा पत्ताच नाही. केवळ प्लास्टिक घालून त्‍यांनी तात्‍पुरती छताची सोय केली आहे. कुत्रेही आपल्‍यासोबत घर वजा झोपडीत राहत असल्याने आरोग्याचीही समस्या निर्माण होईल, अशी भीती किशन गडेकर यांनी व्यक्त केली. सरकारने त्‍यांना आधार देण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com