'बस स्थानक प्रकल्पासाठी सरकारला दोष देता येणार नाही, ती चूक कंत्राटदाराची'

विकासासाठी मुरगाव पालिकेलाही निधी उपलब्ध केलेला आहे. वास्कोचा विकास व्हावा हे आमचेही स्वप्न आहे. मुरगाव बंदराचाही...
'बस स्थानक प्रकल्पासाठी सरकारला दोष देता येणार नाही, ती चूक कंत्राटदाराची'

Pramod Sawant Vasco

Dainik gomantak

आम्ही वास्कोला सापत्न भावाची वागणूक कधीच दिलेली नाही. वास्को मतदारसंघाचा विकास व्हायला हवा ते आमचे स्वप्नच आहे. बस स्थानक प्रकल्पासाठी सरकारला दोष देता येणार नाही. ती चूक कंत्राटदाराची होती असे स्पष्ट करून हा प्रकल्प आम्ही पुढील दीड वर्षात पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वास्कोतील भाजपाच्या जाहीर सभेत दिले.

शहरातील पालिका इमारतीसमोर वास्को भाजपातर्फे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, भाजपाचे वास्कोतील संभाव्य उमेदवार कृष्णा उर्फ दाजी साळकर, नगरसेवक दीपक नाईक, अमेय चोपडेकर, लियो रॉड्रिग्स, प्रजय मयेकर, शमी साळकर, गिराश बोरकर, जयंत जाधव, उर्फान मुल्ला, पूजा नाईक, सुप्रिया नाईक, क्रितेश गावकर, दिगंबर आमोणकर, रिमा सोनुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Pramod Sawant Vasco</p></div>
सेक्स स्कँडलची क्राईम ब्रँचच्या विशेष पथकामार्फत चौकशी व्हावी: आमोणकर

यावेळी मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत (Pramod Sawant) पुढे बोलताना म्हणाले की, वास्कोच्या विकासाच्याबाबतीत आम्ही कमी पडल्याचे ते म्हणाले. वास्कोतील बस स्थानकाचे काम कंत्राटदारामुळे रखडले याला सरकार जबाबदार नसून कंत्राटदाराच्या चुकीमुळे सदर‌ बसस्थानकाचे काम रखडलेले आहे. अन्यथा प्रकल्प पूर्ण झाला असता. तो दोष सरकारचा नाही, असे स्पष्ट करून त्यांनी बसस्थानकाच्या प्रश्नावर कंत्राटदारालाच दोष दिला.

स्थानिक माजी आमदार (MLA) वास्कोतील (Vasco) विकासाच्या

प्रश्नावर सरकारवर आरोप करीत आहे. मात्र, सरकारने (Government) वास्कोला सापत्नभावाची वागणूक कधीच दिलेली नाही. तेच विकास कामांचा पाठपुरावा करण्यास कमी पडले असावेत. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांकडे बोट दाखवते तेव्हा चार बोटे आपल्याकडे वळत असतात याचे भान आरोप करणाऱ्यांने आधी ठेवावे असे मुख्यमंत्र्यांनी टोला मारुन वास्को कदंब बसस्थानकाचे काम पुढील दीड वर्षाच्या काळात पूर्ण करू, असे आश्वासन दिले. विकासासाठी मुरगाव (Mormugao) पालिकेलाही निधी उपलब्ध केलेला आहे. वास्कोचा विकास व्हावा हे आमचेही स्वप्न आहे. मुरगाव बंदराचाही पुढीलकाळात विकास होणार असून हा विकास कोळसा वाहतुकीसाठी नव्हे तर वास्कोला पर्यटन स्थळ बनवण्यासाठी होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी काॅग्रेस (Congress) पक्षावर आपला मोर्चा वळविताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडे देशात आणि

<div class="paragraphs"><p>Pramod Sawant Vasco</p></div>
...तर मी मडगावातून निवडणूक लढवणार: बाबू आजगावकर

गोव्यातही (goa) नेतृत्व नाही. त्यांचे नेतेचे पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपाच (BJP) सत्तेवर येणार असून काँग्रेसचे अस्तित्व राहणार की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. गोव्याचा विकास खऱ्या अर्थाने 2012 सालापासूनच झालेला असून पुढची पाच वर्षेही समृध्दीचीच असतील. मागच्या पन्नास वर्षांत केंद्र सरकारकडून (Central Government) विकासासाठी जेवढा निधी गोव्याला मिळाला नाही, तेवढा निधी मागच्या आठ दहा वर्षात मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, अॅड नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष दामू कासकर, जयंत जाधव, उर्फान मुल्ला, दाजी साळकर व इतर मान्यवरांची भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन रिमा सोनुर्लकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.