राज्य सरकार विद्यार्थ्यांना जहाज उद्योगात प्राधान्य देणार; प्रमोद सावंत

गोवा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी सरकार कटिबद्ध.
राज्य सरकार विद्यार्थ्यांना जहाज उद्योगात प्राधान्य देणार; प्रमोद सावंत
Pramod SawantDainik Gomantak

दाबोळी : शिक्षण क्षेत्रात गोवा अग्रेसर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्य सरकार विद्यार्थ्यांना जहाज उद्योगात प्राधान्य (Preference in the ship industry) देण्यासाठी पुढाकार घेणार असून कौशल्य भारत अंतर्गत गोवा सरकार विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक ज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister of Goa Pramod Sawant) यांनी दिली.

कुठ्ठाळी - साकवाळ जुआरी नगर येथील मुरगाव शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवृत्त प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुरगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माधव कामात, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, भास्कर नाईक, खजिनदार सौ ललिता परेश जोशी, प्राचार्य श्रीमती मीनाक्षी वावा, सदस्य किशोर तोलानी उपस्थित होते.

Pramod Sawant
टॅक्सीला मीटर बसवा अन्यथा कारवाई होईल; न्यायालयाने काढला आदेश!

ते पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) म्हणाले की राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या सहकार्याने जहाज उद्योगात पुढाकार घेण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार स्व: वसंतराव जोशी यांचा शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य वाटा असून याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन राजेंद्र आर्लेकर राज्यपाल तर राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून माविन गुदिन्हो,मिलिंद नाईक आहे.

1971 साली सुरू करण्यात आलेल्या मुरगाव शिक्षण संस्थेने आज संपूर्ण गोव्यात आपले शिक्षण क्षेत्रात वेगळे स्थान प्राप्त केले आहे. यात विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात यणारे शिक्षक वर्गाचा महत्त्वाचा वाटा असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष माधव कामात बरोबर निवृत्त प्राचार्य, शिक्षक व प्रशासन अधिकारी यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना उपाध्यक्ष परेश वसंतराव जोशी म्हणाले की मुरगाव शिक्षण संस्थेने सुरू केलेले कार्य यापुढेही सुरूच राहणार आहे. यासाठी संस्थेने किंडरगार्टन ते पदवीपर्यंत शिक्षण देण्याचे ठरविले आहे .कारण येथे किंडरगार्टन पासून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण, उच्च माध्यमिक नंतर पदवीप्राप्त पर्यंत शिक्षण घेता येईल.

यासाठी मुरगाव शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन राज्य शिक्षण संचालकाकडे किंडरगार्टन त पदवीप्राप्त पर्यंत शिक्षणाची मागणी केली असल्याची माहिती परेश जोशी यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. यावेळी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा ,राज्य उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर ,उद्योजक इक्बाल मोहिदीन, सुकात शानबाग ,पराग जोशी, पंकज जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिदालिया बोदाडे यांनी केले. तर स्वागत ललिता जोशी यांनी केले. सत्कारमूर्ती तर्फे डॉ. आर बी पाटील,माधव कामत यांनी आपले विचार मांडले. तर आभार प्रदर्शन किशोर तोलानी यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com