Manohar Airport: विमानतळासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्याबाबत सरकार गंभीर नाही; भाजप आमदाराचाच आरोप

आमदार प्रवीण आर्लेकर यांचा घरचा आहेर, केवळ 40 रूपये प्रती चौरसमीटर दर दिल्याची माहिती
Pravin Arlekar on Mopa International Airport | Goa News
Pravin Arlekar on Mopa International Airport | Goa News Dainik Gomantak

Manohar Internationan Airport: राज्य सरकारने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थानिकांच्या जमिनी घेतल्या, पण त्याबदल्यात अत्यंत कमी मोबदला दिला, अशी टीका पेडणेचे भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. आर्लेकर यांची टीका ही सरकारला घरचा आहेर मानली जात आहे.

Pravin Arlekar on Mopa International Airport | Goa News
Goa Cashew Feni : विमानतळांवर मिळणार ड्युटी-फ्री 'गोव्याची फेणी'; प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, ज्यांच्या जमिनी विमानतळासाठी घेतल्या त्यांच्याबाबत सरकार गंभीर नाही. सरकारने टेनन्सी केस दाखल करून स्थानिकांच्या जमिनी घेतल्या. पण या जमिनींना केवळ 40 रूपये प्रती चौरस मीटर असा दर दिला आहे.

5 जानेवारीपासून विमानतळावर विमानवाहतूक सुरू झाली आहे. भविष्यात येथे अनेक प्रकल्प येतील. फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेल्स होतील. त्यांच्याकडून लाखाने पैसे सरकार घेईल. पण ज्या गरीबांच्या जमिनी गेल्या त्यांना मात्र कमी पैसे दिले.

सरकारने योग्य दर द्यावा. 160 रूपये असा सरकारचा दर सुरू आहे, असे सांगितले जाते. पण किमान एक हजार ते दीड हजार रूपये प्रती स्क्वेयर मीटर दर द्यावा, अशी आमची मागणी आहे.

Pravin Arlekar on Mopa International Airport | Goa News
Land Grab Case: अखेर जमिन हडप प्रकरणाची उद्यापासून आयोगासमोर सुनावणी...

स्थानिकांना किती नोकऱ्या दिल्या ते स्पष्ट करावे...

आमदार आर्लेकर म्हणाले की, सरकार म्हणते स्थानिकांना 1400 नोकऱ्या दिल्या. त्यातील बराचशा नोकऱ्या कायमस्वरूपी नाहीत. त्यामुळे येथील तरूण रोजगारासाठी बाहेर जाऊ लागला आहे.

सरकार जरी 1400 नोकऱ्या दिल्या असे सांगत असले तरी आम्हाला ते पटत नाही. आत्ता सध्या किती स्थानिक लोक विमानतळावर नोकरीत आहेत, ते सरकारने स्पष्ट करावे.

टॅक्सीचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. सध्याचे बहुतांश टॅक्सीचालक हे बाहेरचे आहेत. स्थानिक पेडणेवासीयांना प्रथम प्राधान्य देणार असे सांगण्यात आले होते. आमच्या 170 गाड्यांना तुम्ही आधी प्राधान्य दिले पाहिजे. आमचेच भाजपचे सरकार आहे, मुख्यमंत्र्यांनी यात पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावावा, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com