Haath Se Haath Jodo : देशात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : आमदार फेरेरा

म्हापशात काँग्रेसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान
Haath Se Haath Jodo Goa was held at Mapusa
Haath Se Haath Jodo Goa was held at MapusaDainik Gomantak

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई, बेरोजगारी तसेच जाती-धर्मांमध्‍ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारी आस्थापने विकणे, जवळच्‍या उद्योजकांना गोंजरणे तसेच सर्वसामान्यांना वेठीस धरणे असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.

अच्छे दिनाच्या नावाने भाजपने लोकांचे सुख हिरावून घेतले आहे. भाजप सरकारमधील नेतेच देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला.

काँग्रेतर्फे काल शनिवारी म्हापशात आयोजित ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या कार्यक्रमात फेरेरा बोलत होते. म्हापसा मार्केटच्या प्रवेशद्वारावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बाजारपेठेत फिरून लोकांना ‘हात से हात जोडो’ उपक्रमाविषयी जागृती करीत पत्रिका वाटण्‍यात आल्‍या.

शिवाय महागाईविरोधात जागृती करण्‍यात आली. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, शंभू भाऊ बांदेकर, गुरुदास नाटेकर, संजय बर्डे, विजय भिके, जॉन नाझारेथ, नगरसेवक सुधीर कांदोळकर, अ‍ॅड. शशांक नार्वेकर, नौशाद चौधरी, प्रतीक्षा खलप आदी आणि कायकर्ते उपस्थित होते.

संजय बर्डे म्हणाले, भाजप सरकार गरीब लोकांच्या खिशातून पैसे काढून धनाढ्य लोकांचे खिसे भरत आहे. सध्या इंधनाच्या दराने उच्चांक गाठला आहे. काँग्रेसने ७० वर्षांच्या राजवटीत देशाला वैभवशाली बनविले. उलट भाजपने आज देश विकायला काढला आहे.

सार्दिन यांच्‍याबाबत बोलायचे टाळले

दिव्यांग लाभार्थीला अपमानास्पद वागणूक दिल्याने सध्या दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. याविषयी आमदार कार्लुस फेरेरा यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.

काहींकडून हा विषय वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. सार्दिन हे चांगले व्यक्तिमत्व आहे. त्‍या विषयाबाबत मी त्यांच्याशी अजून बोललेलो नाही. जोपर्यंत मी त्यांची बाजू ऐकत नाही, मला याविषयी भाष्य करता येणार नाही. सध्या लोकसभा निवडणूक जवळ असल्याने विरोधकांकडून त्यांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न होत असावा, अस दावा त्‍यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com