गणेश उत्सवाला गालबोट: सांगेत पोस्टर, होर्डिंग फाडण्याचे प्रकार

गोव्यात गणेशभक्तांच्या भावना दुखावल्याने संताप
गणेश उत्सवाला गालबोट: सांगेत पोस्टर, होर्डिंग फाडण्याचे प्रकार
Ganesh Chaturthi 2021Dainik Gomantak

सांगे - विधानसभा निवडणूक (Assembly elections) जशी जवळ येऊ लागली, तशी सांगेतील राजकीय हवा तापू लागली आहे. आगामी काळात गुंडगिरी वाढण्याचे संकेत आताच मिळू लागले आहे. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना, तसेच नागरिकांनी जनतेला शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र बॅनर, होर्डिंग लावले होते. त्यापैकी आमदार प्रसाद गावकर, सावित्री कवळेकर, तसेच ‘आरजी’चे होर्डिंग, बॅनर फाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकांनी या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

हे कृत्य करणाऱ्यांनी त्या होर्डिंगवर गणपतीचे चित्र असल्याचे भान न ठेवता त्यांची नासधूस केल्याने भक्तांच्या भावना दुखविल्या असून या प्रकारात जे कोणी सहभागी झाले असतील त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी अशा कृत्यiत सामील असणाऱ्यांविरुद्ध विघ्नहर्ता गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. सावित्री कवळेकर यांनी गेल्या साडेचार वर्षांत बऱ्यापैकी समाजसेवा केली आहे. त्याचाही धसका घेतल्याने पोस्टर, होर्डिंगची नासधूस करण्यात येत आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Ganesh Chaturthi 2021
Goa: रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गणपती बाप्पाचा प्रवास खडतर

‘रिव्होल्युशनरी गोवन्स’ कडून निषेध

रिव्होल्युशनरी गोवन्स या संघटनेने चारच दिवसांपूर्वी सांगेत कार्यालय उघडले आहे. त्यांच्याही कार्यालयाच्या, तसेच इतर फलकांची नासधूस केली आहे. ‘आरजी’ने सांगेत मोर्चेबांधणी सुरू केली असून तिला सांगेत रोखण्याचा अनेकदा प्रयत्न झाला होता. त्यातूनच अनेक भागांतील शुभेच्छा फलक फाडण्यात आल्याची तक्रार सांगे पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. मनोज परब यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अशा घटनांमुळे संघटना खचणार नाही. उलट अधिक नेटाने कामाला लागेल, असे त्यांनी सांगितले. अनेक नागरिकांनी या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com