Goa Art: कलाकारांसाठी आनंदाची बातमी! यापुढे ‘कोमल कोठारी’ पुरस्‍कार विभागून दिला जाणार नाही

पश्चिम विभागीय सांस्कृतिक कला केंद्रातर्फे देण्यात येणारा अडीच लाखांचा ‘कोमल कोठारी’ पुरस्कार आता एकापेक्षा जास्त व्यक्तींना दिल्यास विभागला जाणार नाही.
Art  |
Art |Dainik Gomantak

Goa Art: पश्चिम विभागीय सांस्कृतिक कला केंद्रातर्फे देण्यात येणारा अडीच लाखांचा ‘कोमल कोठारी’ पुरस्कार आता एकापेक्षा जास्त व्यक्तींना दिल्यास विभागला जाणार नाही. दोन कलाकारांना हा सन्मान दिल्यास दोघांनाही अडीच लाख रुपये दिले जातील,

अशी घोषणा राजस्थानचे राज्यपाल आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांनी काल रविवारी गोव्यात झालेल्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या गव्हर्निंग कौन्सिल आणि कार्यकारी परिषदेच्या संयुक्त बैठकीत केली.

कलाकारांना वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याच्या सूचना देतानाच यासंदर्भातील प्रस्तावालाही त्यांनी यावेळी मान्यता दिली. 2023 मध्ये गोव्यात नॉर्थ ईस्ट ऑक्टेव्ह फेस्टिव्हल आयोजित करण्‍यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. ईशान्येतील कलाकारांच्या कलेच्या संवर्धनासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

बैठकीत राज्यपाल मिश्रा यांनी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्रांतर्गत पारंपारिक आणि लुप्त होत चाललेल्या आदिवासी कलांच्या विविध कलाप्रकारांचे जतन, दस्तऐवजीकरण आणि जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी गांभीर्याने काम करण्याच्या सूचना केल्या.

केंद्राच्या अंतर्गत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण दीव, दादरा नगर हवेली येथील लोक, पारंपरिक आणि आदिवासी कला प्रकारांचे संवर्धन, कलाकारांच्या परस्पर देवाणघेवाणीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी भर दिला. नामवंत कलाकारांचे अनुभव आणि योगदान यावर लेखनाच्या प्रकल्पांवरही काम व्हायला हवे, असे ते म्हणाले.

Art  |
Health service: आरोग्यविषयक सेवेत रेडक्रॉस अग्रभागी

अमिता साराभाई यांचाही बैठकीत सहभाग

तत्पूर्वी, पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालका किरण सोनी गुप्ता यांनी केंद्राच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृती विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे प्रधान सचिव सुबीर कुमार, प्रधान अधिकारी गोविंदराम जयस्वाल हेही या बैठकीला उपस्थित होते.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव अमिता साराभाई यांनी ऑनलाईन बैठकीत भाग घेतला.

केंद्रातील राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील सदस्य राज्यांतील नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते. गोव्यातून प्रा. रामराव वाघ, ज्योती कुंकळकर, देविदास आमोणकर या सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com