Kidney Disease in Goa: गोव्यात फैलावतोय किडनीचा गूढ आजार; डॉक्टरही झाले हैराण

गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंची माहिती; संशोधनाशिवाय उपचार शक्य नसल्याचे मत
Kidney Disease in Goa:
Kidney Disease in Goa:Dainik Gomantak

Kidney Disease Outbreak in Goa: गोव्यात किडनीचा एक गूढ आजार पसरत चालला असून त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्याशिवाय त्या आजारावरील उपचार शक्य नाहीत, अशी माहिती गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल बी. मेनन यांनी दिली आहे.

Kidney Disease in Goa:
Goa Food Court : कुडचडे- काकोडा पालिकेचे फूडकोर्ट, प्लॅटफॉर्मसाठीचे दर ठरले, दर महिना मोजावी लागेल 'एवढी' रक्कम

ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या गोव्यातील उपकेंद्रात BAMS (बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) या कोर्सच्या पहिल्या बॅचचा प्रारंभ करण्यात आला. या पहिल्या बॅचमध्ये 100 विद्यार्थी आहेत.

या बॅचच्या इंडक्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू मेनन यांनी गोव्यात पसरणाऱ्या या विशेष आजाराकडे लक्ष वेधत आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी राज्यातील आरोग्यविषयक समस्यांवर संशोधन करावे, असे मत व्यक्त केले.

प्रा. मेनन म्हणाले की, आगामी काळात लोकांना पुराव्यासाठी पाश्चिमात्य देशांकडे पाहावे लागू नये, यासाठी भारतात संशोधनाची गरज आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, गोवा येथे विद्यार्थ्यांनी गोव्याशी संबंधित आरोग्य समस्या आणि रोगांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्या रोगांवर संशोधन केले पाहिजे.

उत्तर गोव्यात प्रचलित असलेल्या एका गूढ किडनीच्या आजाराचे उदाहरण देताना ते म्हणाले की, उत्तर गोव्यात असे अनेक आजार आढळून येत असून त्यावर सखोल संशोधन केल्यानंतरच त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल.

Kidney Disease in Goa:
Mahadayi Water Dispute: 'म्हादई'बाबत केंद्राचा निर्णय नेमका कुणाच्या बाजुने? सावंत यांच्यासह बोम्मई यांनीही मानले मोदींचे आभार

आयुष व्हिसा लवकरच

दरम्यान, केंद्रीय पर्यटन, बंदरे, जहाज, जलमार्ग राज्य मंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक म्हणाले की, गोवा राज्यातील शेतकऱ्यांनी धारगळ परिसरात 50 एकरांवर पसरलेल्या या विस्तृत आयुर्वेद कॅम्पससाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला आपल्या जमिनी उदार मनाने दिल्या आहेत.

उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात राज्यातील उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतील. लवकरच येथे आयुष व्हिसासारखी सुविधा सुरू होणार आहे, जी आगामी काळात मेडिकल पर्यटनाला चालना देण्याचे काम करेल.

गोवा उपकेंद्र ग्रीन झोन बनणार

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या उपकेंद्राच्या डीन प्रा. डॉ. सुजाता कदम म्हणाल्या की, हे उपकेंद्र ग्रीन कॅम्पस म्हणून उदयास येईल. येथे प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही. येथील परिसरासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणेही वापरली जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com