Bhausaheb Bandodkar : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संकुलाला देणार भाऊंचे नाव : गोविंद गावडे

राज्‍याच्‍या क्रीडा क्षेत्रातही भाऊसाहेब बांदोडकरांचे कार्य उल्लेखनीय
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak

भाऊसाहेबांनी गोव्याच्या विकासाचा पाया रचला. त्यामुळेच एक समृद्ध गोवा आपणा सर्वांना दिसतो आहे. स्वतः एक क्रीडापटू असलेल्या भाऊसाहेबांनी राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. म्हणूनच भाऊंचे स्मरण म्हणून गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संकुलाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव दिले जाईल, अशी ग्‍वाही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

फर्मागुढीत भाऊसाहेब बांदोडकर यांना त्‍यांच्‍या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. भाऊसाहेबांनी गोव्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले ही बाब कुणीही विसरू शकत नाही. पण या विकासाच्या प्रक्रियेतही भाऊसाहेबांनी क्रीडा क्षेत्राला चालना दिली.

Govind Gaude
Goa Forests Fire : वणव्यामुळे जंगलातील दुर्मीळ प्रजातींवर संकट : डॉ. मल्लपती जनार्दनम

त्यामुळेच आज प्रत्येक ठिकाणी क्रीडांगणे उभी राहू शकली. क्रीडांगणांसाठी भाऊसाहेबांनी जमिनी संपादित केल्या म्हणूनच तर आज युवा पिढीला खेळण्यासाठी क्रीडांगणे मिळाली, असे गावडे म्हणाले.

विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही चमकावे

भाऊंचे स्मरण विद्यार्थी वर्गाला आणि युवा पिढीला व्हावे यासाठी राष्ट्रीय क्रीडा महोत्सवात भाऊंचे नाव देण्याचा प्रस्ताव आपण ठेवला असल्याचे सांगून प्रत्येकाचा त्याला पाठिंबा असल्याचे गावडे यांनी सांगितले.

प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला आवडीच्‍या कला आणि क्रीडा स्पर्धांतही भाग घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन त्‍यांनी केले. सरकार विद्यार्थ्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना वाव देते. त्यामुळेच या क्षेत्रातही आपले करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे गावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com