नवीन शिक्षण धोरणाला पाठींबा द्या- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नव्या शिक्षण धोरणामुळे मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

डिचोली: नवीन शिक्षण धोरणामुळे मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. तेव्हा सर्व शाळांनी या धोरणाला पाठींबा देऊन शिक्षण खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. (The new education policy will provide good quality education to children - Chief Minister Pramod Sawant )

रोटरी चॅरीटेबल ट्रस्टतर्फे डिचोलीत बांधण्यात येणाऱ्या सदगुरु कृष्णा शेट्ये शाळा इमारतीची सोमवारी (ता.२०) पायाभरणी केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, जमिनदार सद्‍गुरू शेट्ये, हर्षा शेट्ये, डिचोली रोटरी क्लबचे सुदिन नायक, सचिव ॲड. अमोल सावंत, शाळेचे अध्यक्ष सुदत्त मांद्रेकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या आरंभी मुलांनी स्वागतगीत म्हटले. सुदिन नायक यांनी स्वागत केले. सुदत्त मांद्रेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. शिक्षिका दीक्षिता पळ यांनी सूत्रसंचालन केले.

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो

समाजासाठी आपण काहीतरी देणे लागत आहोत, अशी भावना जर प्रत्येकांनी बाळगली तर समाजाची प्रगती होण्यास मदत होणार आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त करून रोटरीच्या शाळेसाठी जमीन दान केल्याबद्दल सद्‍गुरू शेट्ये कुटुंबियांचे अभिनंदन केले. हर्षा शेट्ये यांनी रोटरी क्लबला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सद्‍गुरू शेट्ये आणि हर्षा शेट्ये यांचा सन्मान करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com