डिचोलीत मजुरांची संख्या झाली कमी; मात्र समस्या कायम

शहरातील पर्यायी बसथांब्यावरील संभाव्य धोका टाळण्यासाठी बसस्थानकाबाहेर रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मजुरां विरोधात गेल्या 29 एप्रिल रोजी पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती.
The number of laborers in Bicholim decreased But the problem persists
The number of laborers in Bicholim decreased But the problem persistsDainik Gomantak

शहरातील बसस्थानकाजवळील मजुरांची संख्या कमी झाली असली, तरी समस्या मात्र कायम आहे. शहरातील पर्यायी बसथांब्यावरील संभाव्य धोका टाळण्यासाठी बसस्थानकाबाहेर रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मजुरां विरोधात गेल्या 29 एप्रिल रोजी पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. (The number of laborers in Bicholim decreased But the problem persists)

The number of laborers in Bicholim decreased But the problem persists
हॉटमिक्सिंग वाहून नेणाऱ्या ट्रकचा चोर्ला घाटात अपघात

पोलिसांनी बसस्थानकाजवळ उभ्या राहणाऱ्या मजुरांना हुसकावून लावताना मजुरांची धरपकडही केली होती. त्यानंतर पोलिस कारवाईच्या भीतीने तीन-चार दिवस मजुरांनी बसस्थानकाबाहेर उभे राहण्याचे टाळले होते. मात्र हळूहळू काही मजुरांनी बसस्थानक परिसरात आपला मोर्चा वळविला आहे. बसस्थानकासमोरील 'माणिक बार आणि रेस्टॉरंट'समोर पुन्हा मजुरांची गर्दी दिसून येत आहे.

सध्याचा पर्यायी बसथांबा भर रस्त्याला टेकून करण्यात आला आहे. मजुरांच्या गर्दीमुळे प्रवासी बसगाड्या आतबाहेर घेताना एखादेवेळी मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे. त्यामुळे या मजुरांना तेथून कायमचे हुसकावून लावावे. अशी मागणी जागृत नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मजुरांचे स्थलांतर

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही मजुरांनी स्वतःहून स्थलांतर केले आहे. तरीदेखील त्याचा विशेष फरक जाणवत नाही. सध्या हे मजूर बसस्थानकाच्या मागच्या बाजूने 'लोकमान्य'समोरील रस्त्यावर मजुरीच्या प्रतीक्षेत थांबलेले असतात. अधूनमधून पूर्वीच्या ठिकाणी त्यांचा वावर दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com