Goa जैन समाजाचा सर्वात पवित्र सण 'पर्युषण पर्वाचा' आज पाचवा दिवस

हा सण आम्ही भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतो अशी माहिती जैन मंडळाच्या अध्यक्षा कल्पना शहा यांनी दिली.
Goa जैन समाजाचा  सर्वात पवित्र सण 'पर्युषण पर्वाचा' आज पाचवा दिवस
जैन मंडळाच्या अध्यक्षा कल्पना शहा आणि जैन मंडळाचे सदस्य Dainik Gomantak

जैन समाजाचा (Jain community) सर्वात पवित्र उत्सव म्हणून पर्युषण पर्व ची ओळख आहे. 3 तारखे पासून सुरू झाला असून, आज या पर्वाचा 5 वा दिवस आहे. जैन समाजातील सगळे बांधव एकत्रीत येऊन हा सण साजरा करतात, 8 दिवसाचा पर्युषण पर्व चालू झाला असून हा सण आम्ही भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतो अशी माहिती जैन मंडळाच्या अध्यक्षा कल्पना शहा यांनी दिली.

जैन मंडळाच्या अध्यक्षा कल्पना शहा आणि जैन मंडळाचे सदस्य
Goa: चतुर्थी साजरी करताना काळजी घ्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

तसेच या पर्वाच्या 8 व्या दिवशी खूप महत्व आहे पूर्ण वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणून या आठव्या दिवसाची ओळख आहे. या दिवशी सगळ्यांना मिच्छामी दुक्कड़म म्हणून वर्षभरातील झालेल्या चुकांबद्दल एकमेकांची माफी मागतात. हा उत्सव सुरू होण्यापूर्वी जैन समाजातील बांधव एकत्रित येऊन सर्व मंदिर, धार्मिक स्थळांची साफसफाई पूर्ण करतात. जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व पुढील आठ दिवस साजरा करतात. तर, दिगंबर पंथातील जैन बांधव १० दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं पालन करतात. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठं पर्व मानलं जातं या पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचं पालन केलं जातं. या पाच सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचा समावेश होतो.

जैन मंडळाच्या अध्यक्षा कल्पना शहा आणि जैन मंडळाचे सदस्य
Goa Ganesh Fastival: माळ्यातलो झरीकार' संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

पर्युषण पर्व म्हणजे नेमक काय?

पर्युषणचा सामान्य अर्थ आहे की, या उत्सवात आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचार दूर करण्याचा उपवास म्हणजे पर्युषण पर्व होय. जैन बांधव या पर्युषण पर्व सणाच्या च काळात मनातील सर्व क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व गोष्टींवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडतो. जैन बांधवांचा पर्युषण पर्व हा सण भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू राहतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या १० नियमांचं पालन करुन पर्युषण पर्व साजरा करत असतात.हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्माचं मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com