Goa Crime News अखेर 'त्या' चिमुरडीच्या मृत्युचे कारण स्पष्ट; मातेवर गुन्हा दाखल

चिमुरडीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे.
Vasco
Vasco Dainik Gomantak

गोवा: मानसिक तणावातून मातेच्‍या हातून 14 महिन्‍यांच्‍या चिमुरडीचा अंत होण्‍याची खळबळजनक घटना चिखली-दाबोळी येथे शनिवारी घडली. चिखली येथील 13 महिन्यांच्या चिमुरडीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. नाक, तोंड आणि गळा दाबल्यामुळे मृत्यु झाल्याचे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आईवर अजूनही उपचार सुरू असुन तिच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The postmortem report declared of the 13-month-old child from Chicalim)

Vasco
Vishwajit Rane गावाच्या विकासासाठी एकत्र या

मुलीच्‍या हत्‍येनंतर मातेने जुवारी नदीच्‍या पुलावरून उडी घेत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. मात्र, परिसरात असणाऱ्या कामगारांनी तिला वाचवले. निमिषा गोणे (वय 38) असे तिचे नाव असून, तिच्‍यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. निमिषा हिने आपल्या घरात दोन्ही हातांच्या शिराही कापून घेतल्या होत्या. या घटनेने राज्‍य हादरून गेले आहे.

निमिषाचा पती नीलेश हा जर्मनीहून गोव्यात दाखल

आज रविवारी पहाटे निमिषाचा पती नीलेश हा जर्मनीहून गोव्यात दाखल झाला. तो आल्यानंतर शवचिकित्सा करण्यात आली. यानंतर चिमुकलीवर संध्याकाळी बोगदा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी नीलेश याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

आठवडाभर नैराश्‍यात

पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषा ही अजून जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने तिने हा प्रयत्न का केला, हे समजू शकले नाही. मात्र, तिचे वडील पी. वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेला आठवडाभर ती नैराश्यात होती. ३ ऑगस्ट रोजी ती एका मानसोपचार तज्ज्ञालाही भेटून आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com