मडगावातील कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर!

मडगाव पालिकेची अनास्था : ‘सोनसोडो’चे गांभीर्य नसल्याचे उघड
मडगावातील कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर!
problem of waste managementDainik Gomantak

मडगाव: कारणे कोणतीही असोत पण मडगावातील कचरा व्यवस्थापन समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे व त्यावरून सोनसोडो व कचरा व्यवस्थापन या बाबत मडगाव नगरपालिका गंभीर नाही, असेच दिसून येत आहे.

(problem of waste management in margao is becoming more serious)

problem of waste management
जमीन हडपल्याप्रकरणी अनेकजण ‘रडारवर’ ; एसआयटीकडून तपास सुरू

अन्यथा अडीच महिन्यापूर्वी नागरी विकास खात्यातर्फे झालेल्या आभासी बैठकीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी न करता कागदावरच राहिले नसते.

गेल्या मार्च अखेरीस झालेल्या या बैठकीस नागरी विकास सचिव, पालिका प्रशासन संचालक, घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे सदस्य सचिव उपस्थित होते. या बैठकीनंतर माजी पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी पालिका अभियंत्याला एक निवेदन सादर केले होते, त्याची प्रत नगराध्यक्षांना एक एप्रिल रोजी पाठविली होती.

कचरा व्यवस्थापनासाठी योजावयाच्या अनेक उपायांचा त्यात अंतर्भाव होता. 15 एप्रिलपर्यंत त्याची अंमलबजावणी आवश्यक होती. पण ते परिपत्रक फाईलीतच राहिले. एकाही उपायाची अंमलबजावणी गेल्या अडीच महिन्यात झाली नाही व त्यामुळे ही समस्या गंभीर बनत चालली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com