पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या वाहन प्रक्रियेचे होणार पुनरावलोकन : माविन गुदिन्हो

पर्यटकांना वाहने भाड्याने देण्याची जी प्रक्रिया आहे त्याचे पुनरवालोकन केले जाईल तसेच रेन्ट ए बाईकला देण्यात येणारी परवानगीची(परमीट) संख्या कमी केली जाईल. ही माहिती स्वत: वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या वाहन प्रक्रियेचे होणार पुनरावलोकन : माविन गुदिन्हो
Mauvin GodinhoDainik Gomantak

गोवा पर्यटकांना आकर्षित करते हे जगभर सर्वश्रुत आहे. पुर्वी जे पर्यटक गोव्यात येत असत ते स्वत:चे वाहन घेऊन येत असत किंवा टॅक्सीने फिरत. पण आता दुचाकी किवा चार चाकी वाहने पर्यटकांना भाड्याने देण्याची सोय झालेली आहे. त्यामुळे पर्यटक स्वत:ची वाहने चालवत गोवाभर फिरतात. मात्र त्याना रस्ते माहित नसल्याने कधी कधी ते गोंधळतात व त्यामुळे अपघात होतात. (The process of renting vehicles to tourists will be reviewed: Mavin Gudinho)

Mauvin Godinho
डिचोलीत मजुरांची संख्या झाली कमी; मात्र समस्या कायम

शिवाय स्वत:कडे वाहन असल्याने हे पर्यटक रात्री अपरात्री फिरत असतात. त्यामुळे वाहने भाड्याने देण्याची जी प्रक्रिया आहे त्याचे पुनरवालोकन केले जाईल तसेच रेन्ट ए बाईकला देण्यात येणारी परवानगीची(परमीट) संख्या कमी केली जाईल. ही माहिती स्वत: वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी मडगावात एका उदघटनास आल्यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

गोव्यात पर्यटकांना अपघात होण्याची संख्या वाढली असून सरकार गप्प बसू शकत नाही. काही तरी उपाययोजना आखली जाईल असेही वाहतूक मंत्री म्हणाले. बुधवारी झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. भाड्याने देणाऱ्या वाहनांना यापुढे परवानगी देऊ नये असे या बैठकीत ठरले.

पुर्वी अशा वाहनांना परवानगी अर्ज सुद्धा न करता दिली जात. पण गेल्या आठ महिन्यात आपण एकही परमीट दिले नसल्याचे वाहतूक मंत्र्यांनी स्पष्ट केले. आम्हाला आमचे रस्ते सुद्धा सुरक्षीत ठेवायला पाहिजे. पर्यटक वापरतात तो जीपीएस डेटा सुद्धा पुर्वीचा असू शकेल. कदाचीत त्यावर चुकीची माहिती सुद्धा असू शकते, असेही वाहतूक मंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.