अनुसूचित जमातीला गोव्यात राजकीय आरक्षण दृष्टीक्षेपात

कोरोनामुळे बंद पडलेले ऊटा संघटनेचे कार्यक्रम आता पुन्हा सुरु करण्यात येणार
ऊटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप
ऊटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीपdainik gomantak

फातोर्डा : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत यांची दुसऱ्यांदा निवड होत आहे. यासाठी त्यांचे ऊटा संघटनेकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय व्यासपीठावर एसटी समाजाकडून मागण्यात येत असलेल्या राजकीय आरक्षणाला चालना मिळणार असल्याचे ऊटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी मडगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (The program of the Utah Association will now be resumed)

ऊटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप
'दक्षिण गोव्यात वर्षभरात जिल्हा पंचायत भवन बांधण्यासाठी प्रयत्न करणार'

पुढे बोलताना वेळीप यांनी सांगितले कि, मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी अंत्योदय तत्वावर राज्याचा विकास करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. याबरोबरच त्यांच्याकडून तशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे (Corona) मागील दोन वर्षांपासून बंद पडलेले ऊटा संघटनेचे कार्यक्रम आता पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी संघटनेतर्फे या समाजाकडून निवडणुकीत निवडून आलेल्या गणेश गावकर, गोविंद गावडे, रमेश तवडकर व आंतोन व्हाझ यांचेही यावेळी अभिनंदन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com