Margao Municipality: राखीव निधीतून देणार कर्मचाऱ्यांचे वेतन!

मडगाव पालिकेला सरकारने दिली मंजुरी
Goa | Margao Municipality
Goa | Margao MunicipalityDainik Gomantak

Margao Municipality नगरपालिकेच्या राखीव निधीतून कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यास सरकारने मंजुरी दिल्याची माहिती मुख्याधिकारी बार्रेटो यांनी दिली.

सध्या नगरपालिकेकडे 50 लाख रुपये असून सरकारने राखीव निधीतून एक कोटी रुपये वापरण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, इतका निधी असूनही नगरपालिका कर्मचारी, रोजंदारीवरील मजूर व दारोदारी कचरा गोळा करणारे कंत्राटदार यांचे पूर्ण महिन्याचे वेतन या रकमेतून देणे शक्य होणार नाही.

त्यामुळे या पेचप्रसंगाबाबत मडगाव नगरपालिका काय निर्णय घेते, ते पाहावे लागेल. नगरपालिका सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना एकूण वेतनाचा काही भाग तसेच रोजंदारीवरील मजुरांचा अर्धा पगार देण्याची शक्यता आहे. बाकीचे वेतन नंतर जमा करण्याची शक्यता आहे. या महिन्याचे वेतन कसे द्यायचे याचा निर्णय अजून घेतलेला नाही.

आमच्यासमोर पर्याय आहे तो प्रथम कर्मचाऱ्यांचे वेतन देणे, नंतर रोजंदारीवरील मजुरांचे व कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदारांचे वेतन, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दहा डेटा ऑपरेटरचे एक महिन्याचे वेतनसुद्धा नगरपालिका निधीतूनच दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Goa | Margao Municipality
Bike rally: महिला दिनानिमित्त दुचाकी रॅली

पालिकेला करावी लागणार कसरत

नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कमच एक कोटी ६० लाख रुपये असते. रोजंदारीवरील मजुरांना द्यायची रक्कम सुमारे ३५ लाख रुपये आहे. याच्या व्यतिरिक्त कचरा गोळा करणारे कंत्राटदारही आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे वेतन देताना नगरपालिकेला कसरत करावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com