घोटेलीत व्हरांड्यात भरते शाळा; शिक्षण खात्याचे दुर्लक्ष

36 विद्यार्थ्यांसाठी एकच वर्ग खोली
घोटेलीत व्हरांड्यात भरते शाळा; शिक्षण खात्याचे दुर्लक्ष
Goa SchoolDainik Gomantak

पर्ये : सत्तरी-केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील धनगरवाडा - घोटेली क्र. 2 येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात गेल्या 10 वर्षांपासून विद्यार्थी पटसंख्या वाढत असूनही अतिरिक्त वर्ग खोली उभारण्याकडे शिक्षण खात्याचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण खात्याबरोबरच लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज आहे.

Goa School
वशालबाग धारगळ येथे चारचाकीची ट्रकला धडक; तिघे जखमी

धनगरवाडा हे विद्यालय एका वर्ग खोलीचे असून यंदा यांची विद्यार्थी पटसंख्या 36 विद्यार्थी आहेत. त्यामुळे एका वर्गामध्ये एवढे पहिली ते चौथी पर्यंतच्या चारही वर्गाचे विद्यार्थी बसायला जागा नसल्याने दोन वर्ग व्हरांड्यात बाक टाकून आणि फळा उभारून सुरू करण्यात आले आहेत.

परंतु विद्यार्थ्यांना येते बसणे कठीण होत असून शिक्षकांनाही शिकवणे अवघड होत आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी, थंड हवेचाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावी लागत आहे, अशी माहिती पालक वर्गांतर्फे देण्यात आली.

विद्यार्थी पटसंख्या वाढत असल्याने इथल्या पालक शिक्षक-संघातर्फे अतिरिक्त वर्ग उभारण्याची मागणी शिक्षण खात्याकडे पाठवली आहे. ही मागणी शिक्षण खात्याने मान्यता देऊन वित्त खात्याकडे पाठवली. परंतु अद्याप काहीच कार्यवाही न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे कठीण होत आहे. पटसंख्या वाढत असूनही शिक्षण खात्याचे दुर्लक्ष होत आहे.

विद्यालयात इंग्रजी भाषा शिकवणार शिक्षक दीर्घ सुट्टीवर आहे. त्याबदल्यात शिक्षण खात्याने पर्यायी शिक्षक उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गैरसोय होत आहे. इंग्रजी शिक्षकाची नेमणूक करावीस अशा पालक वर्गाची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com