Goa CET Scrapped: मोठी बातमी! गोवा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कायमची रद्द

व्यवसाय शिक्षण प्रवेशासाठी यासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार
Goa CET Scrapped
Goa CET ScrappedDainik Gomantak

Goa CET: व्यवसाय शिक्षण प्रवेशासाठी बंधनकारक असलेली गोवा राज्य सामईक प्रवेश परीक्षा (Goa CET Scrapped) राज्य सरकारने कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही. अभियांत्रिकी, वैद्यकीय यासारख्या व्यवसाय शिक्षणासाठी यापुढे राष्ट्रीय प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स किंवा नीट प्रवेश परीक्षा आवश्यक असणार आहे.

(The State Government scrapped Goa Common Entrance Test, will not held text after next year)

Goa CET Scrapped
Goa Jobs: नोकरीच्या शोधासाठी लागल्या रांगा

मागील दोन दशकांपासून सुरू असलेली राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2024 पासून घेतली जाणार नाही. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीचे अभियांत्रिकी प्रवेश राष्ट्रीय जेईई-मेन्स परीक्षेच्या गुणांवर आधारित देण्यात येतील. तर, बी-फार्मसी प्रवेशासाठी नीट किंवा जेईई परीक्षेतील भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) यांची सरासरी विचारात घेतली जाईल. असे राज्य केंद्रीय प्रवेश विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Goa CET Scrapped
Goa News: चिंबल खाडीवरील पुलाच्या कामाला अखेर सुरुवात

तसेच, विविध वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस (होमिओपॅथी), बीएएमएस (आयुर्वेद), आरोग्य विज्ञान, बीएस्सी नर्सिंग या व्यवसाय शिक्षणासाठी नीट परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. आर्किटेक्चर शिक्षणासाठी राष्ट्रीय योग्यता चाचणीचे गुण विचारात घेतले जातील, आर्किटेक्चर (architecture) विभागामार्फतच ही चाचणी घेतली जाईल. असे विभागाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com