बदल्याची भावना! मास्तरणीला विधवा करण्याचा विद्यार्थ्याने आखला डाव

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल केपे पोलिसांनी काकूमड्डी हिरेमठ (Kakumaddi Hiremath) याला खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल भादंसंच्या 307 कलमाखाली अटक करण्यात आली.
Crime
CrimeDainik Gomantak

केपे: दहावीत असताना आपल्याला मास्तरणीने मारले याचा मनात धुमसत असलेल्या काकूमड्डी केपे येथील अभिषेक हिरेमठ (25) या युवकाने तिच्या पतीला पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने तिच्या पतीला जाग आल्याने मोठा अनर्थ टळला. असोलडा केपे येथे निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मीकांत शिकेरकर (Laxmikant Shikerkar) यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल केपे पोलिसांनी काकूमड्डी हिरेमठ (Kakumaddi Hiremath) याला खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल भादंसंच्या 307 कलमाखाली अटक करण्यात आली.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 3.30 वा. अभिषेक लक्ष्मीकांत शिकेरकर यांच्या घराची कौले काडून आत शिरला. यावेळी त्याच्याकडे सुरा, पेट्रोल व दांडा होता.त्याने प्रथम खोलीत असलेल्या पर्स मधून पैसे चोरले व तेथेच झोपलेल्या शिकेरकर यांच्यावर पेट्रोल ओतून आग लावण्याच्या तयारीत असताना शिकेरकर याना आपल्यावर काही तरी पडले आहे असे वाटून अचानक जाग आल्याने त्यांनी अभिषेक याला पकडून ठेवले व केपे पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी अभिषेकला अटक केली.

Crime
वेश्याव्यवसायासंबंधीत आरोपीच्या हणजुण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अभिषेक हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. शेलडे येथील सरकारी विद्यालयातून तो दहावीत प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला होता. सदर प्रकाराबद्दल पोलिसांनी त्याला विचारले असता शिकेरकर यांची पत्नी शेलडे सरकारी विद्यालयात शिक्षिका असून त्यांनी आपल्याला दहावीत असताना मारले होते व याचा वचपा काढण्यासाठी आपण हे कृत्य केले असल्याचे अभिषेकने सांगितले. केपे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून केपेचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com