वाहन परवान्यासाठी प्रणाली कडक हवी; DGP Jaspal Singh

पोलिस महासंचालक : 15 हजार परवाने निलंबन करण्यासाठी शिफारस
DGP Jaspal Singh
DGP Jaspal SinghDainik Gomantak

वाढते अपघात ही चिंतेची बाब आहे. चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती बरोबरच वाहन परवाने जारी करण्यासंदर्भातील प्रणाली आणखी कडक करण्याची आवश्यकता आहे, असे सूतोवाच पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी केले.

DGP Jaspal Singh
Goa Tiger project : व्याघ्र प्रकल्पाचा कडवळ, वायंगिणीला फटका

रस्ता सुरक्षतेसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल. तसेच, पोलिसांकडून वाहतूक विभागास जवळपास 15 हजार वाहन परवाने निलंबित करण्याबाबत शिफारस केल्याची माहिती त्यांनी दिली. सोमवारी म्हापशात राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमस्थळी ते माध्यमांशी बोलत होते.

जसपाल सिंग पुढे म्हणाले की, वाहतूक परवाना निलंबित केल्यास चालकांमध्ये भीती राहील. अशावेळी परवाने निलंबनाचा निर्णय हा वाहतूक अपघात रोखण्याच्या अनुषंगाने सकारात्मक पाऊल आहे.

त्याचप्रमाणे, ड्रायव्हिंग स्कूल व पालकांनी मुलांमध्ये वाहतूक नियम व कायद्यांबाबत बिंबविणे गरजेचे आहे. तसेच, वाहतूक परवाना जारी करण्याची प्रणाली ही कडक असावी. कारण, अनेकदा चालकास वाहतूक चिन्हे किंवा नियमांची अचूक माहिती नसते.

DGP Jaspal Singh
Vishal Golatkar Murder Case: संशयित अमेय वळवईकरच्या, जामीन अर्जावर उद्या सुनावणी

जोवर वाहतूक नियम व चिन्हांविषयी माहिती नसेल, चालकांत शिस्त येणारच नाही, याकडे पोलिस महासंचालकांनी लक्ष वेधले. अपघातातील ६० टक्के प्रकरणे ही चालकांच्या निष्काळजीपणामुळेच असल्याचे सिंग म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसह संयुक्त बैठक घेऊन लोकांकडून रस्ता सुरक्षाबाबत सूचना मागविल्या होतात. या सूचनांवर काम सुरू आहे, असेही सिंग म्हणाले.

पर्यटकांपेक्षा स्थानिक अधिक

पर्यटकांचा अपघातातील सहभाग वाढलेला दिसतो, असे विचारले असता पोलिस महासंचालक जसपाल सिंग म्हणाले की, डेटा याला पाठिंबा (सपोर्ट) करत नाही. प्रत्येक महिन्याला आम्ही विश्लेषण करतो. मुळात पर्यटकांचा अपघातामधील सहभाग हा अतिशय नगण्य आहे. अधिकतर अपघात प्रकरणात स्थानिक लोकसंख्येचा समावेश आहे. राहिला प्रश्न, राज्यातील प्रदेश रचनेचा तर याच्याशी अपघातांचा थेट संबंध नसतो. कारण, जगातील रस्ते हे एकसमान नियमांनुसारच असतात. फरक केवळ लेफ्ट किंवा राईट ड्रायव्हिंगचा असतो, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com