सत्तरीत नवचेतना प्रगती मंचचा तिसरा वर्धापनदिन उत्साहात

सत्तरी येथील नवचेतना प्रगती मंचचा (Navchetana Pragati Manch) तिसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सत्तरीत नवचेतना प्रगती मंचचा तिसरा वर्धापनदिन उत्साहात

Navchetana Pragati Manch

Dainik Gomantak 

गुळेली: सत्तरी येथील नवचेतना प्रगती मंचचा (Navchetana Pragati Manch) तिसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ट्रायबल वेल्फेअर खाते यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण गोवा (South Goa) विभाग शिक्षण खात्याचे उपसंचालक डॉ. उदय गावकर, सौ. देविका गावकर, माजी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे, भिरोंडा पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच नितीन शिवडेकर, देवस्थानचे पुजारी राजा गावकर, इंडियन ओवरसीस बँकेचे शाखा व्यवस्थापक तथा मंचचे अध्यक्ष प्रदीप गावडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उदय गावकर म्हणाले की आजच्या घडीला शिक्षणाची अत्यंत गरज आहे मुलांनी आपले करिअर सुरवातीपासून निश्चित करून त्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले. प्रगती मंचने या वर्षांत चांगली प्रगती करीत अनेकांना संधी उपलब्ध केली आहे असे ते म्हणाले.

प्रेमनाथ हजारे (Premnath Hazare) म्हणाले, नवचेतना प्रगती मंचने गावात आपल्या कार्यातून लोकांमध्ये नवचेतनाच प्राप्त करून दिली आहे. युवकांना चेतना मिळण्यासाठी कलागुणांना वाव मिळवून दिला आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते ते उपलब्ध करून ही स्ंस्था देते त्या बद्दल हजारे यांनी गौरवोद्गार काढले. पंच तथा माजी सरपंच नितीन शिवडेकर म्हणाले, मंचनेगेल्या तीन वर्षांत विविध कार्यक्रम राबवून महिलांना, युवकांना व्यासपीठ दिले आहे. त्यातून कला गुणांना वाव मिळाला आहे. हे कार्य करण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे . दुर्लक्षित जनतेला पुढे आणण्यासाठी ही संस्था नेहमी प्रयत्नशील असेल असे ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Navchetana Pragati Manch</p></div>
मेळावलीतील आंदोलनापुढे सरकारही झुकले

दीपप्रज्वलन करून वर्धापनदिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उदय गावकर , प्रेमनाथ हजारे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवचेतना स्वयंसाहाय्य गटाच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले व मान्यवरांचे स्वागत केले. मंचतर्फे दहावी, बारावी, पदवीधारकांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर मंचतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात समईनृत्य, कळशी नृत्य, मुसळ नृत्य, गोफ, वीरभद्र आदी प्रकार सादर झाले.किशन गावकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com