Goa Women's Premier League: स्पर्धेला आजपासून पर्वरीत सुरवात, शिखासह प्रमुख खेळाडूंचे आकर्षण

गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे राज्यातील महिला क्रिकेटपटूंना मोठी संधी मिळत आहेत.
Goa Women's Premier League
Goa Women's Premier LeagueDainik Gomantak

Goa Women's Premier League गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून (ता. 1) पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरवात होत आहे. भारताची आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज, गोव्याची कर्णधार शिखा पांडे हिच्यासह देशातील काही प्रमुख महिला क्रिकेटपटूंचे स्पर्धेत आकर्षण असेल.

एकूण पाच संघांच्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, सामने प्रकाशझोतातही खेळले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना नऊ एप्रिल रोजी खेळला जाईल. शनिवारी संध्याकाळी सेलेस्ते सुपर वूमन्स व पणजी जिमखाना या संघांत स्पर्धेतील पहिला सामना होईल.

एमसीसी, जीनो ड्रॅगन्स, व्हेंचर इलेव्हन हे स्पर्धेतील अन्य संघ आहेत. स्पर्धेतील गट विजेता संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संघात एलिमिनेटर लढत होईल व त्यातील विजेता संघ अंतिम फेरीत दाखल होईल. स्पर्धेत एकूण 13 सामने होतील. विजेत्या संघाला दोन लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला एक लाख रुपये बक्षीस मिळेल.

Goa Women's Premier League
Goa Professional Football League: धेंपो क्लबने सलग दुसऱ्यांदा पटकावले प्रोफेशनल लीगचे विजेतेपद

स्पर्धेतील प्रमुख खेळाडू

शिखा पांडे स्पर्धेत पणजी जिमखान्यातर्फे खेळेल. महाराष्ट्राची तेजस हसबनीस व मुक्ता मगरे या शिखाच्या संघातील प्रमुख सहकारी आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरतर्फे खेळलेली पूमन खेमनार हिलाही पणजी जिमखान्याने संघात घेतले आहे.

महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात शिखाची सहकारी असलेली जसिया अख्तर सेलेस्ते संघातील प्रमुख खेळाडू आहे. मध्यप्रदेशची डावखुरी प्रीती यादवही या संघातून खेळेल. काश्मीरच्या जसियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान व पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे.

बडोद्याची अनुभवी तरन्नुम पठाण व्हेंचर इलेव्हन संघाची कर्णधार असून मध्यप्रदेशची तमन्ना निगम ही संघातील अन्य मुख्य खेळाडू आहे. बडोद्याची तन्वीर शेख ही देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू एमसीसी संघात आहे.

Goa Women's Premier League
National Women's Football: आंध्रला नमविले, हिमाचलचे राजस्थानवर 15 गोल

राज्यातील महिला खेळाडूंना संधी

गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे राज्यातील महिला क्रिकेटपटूंना मोठी संधी मिळत आहेत. उदयोन्मुख खेळाडूंत पूर्वा भाईडकर (सेलेस्ते), पूर्वजा वेर्लेकर (जीनो), तनया नाईक (जीनो), इब्तिसाम शेख (जीनो), दीक्षा गावडे (व्हेंचर), हर्षिता यादव (व्हेंचर), सावली कोळंबकर (व्हेंचर), पूजा यादव (पणजी जिमखाना) यांच्यासह सुनंदा येत्रेकर, श्रेया परब, तेजस्विनी दुर्गड (सर्व एमसीसी), विनवी गुरव (सेलेस्ते), रेशा कोरगावकर व प्रतीक्षा गडेकर (पणजी जिमखाना), निकिता मळीक (व्हेंचर) या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com