
Electric Bus केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मी हल्लीच दिल्लीत भेट घेतली असून कदंब महामंडळासाठी 500 नवीन ई-बसेस देण्याची विनंती केली आहे. त्यांनी 250 ई-बसेस देणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्या पुरेशा नाहीत. त्यामुळे बसेसची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
पर्वरी येथे विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते. तोट्यातील महामंडळे बंद करणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. परंतु कदंब महामंडळाला आम्ही नफा आणि तोट्याच्या तागडीत तोलत नाही.
राज्यातील खेडोपाड्यात जाऊन सर्वसामान्यांना वाहतूक सेवा देण्याचे काम कदंब महामंडळ करते. कोरोना काळातही कदंबने वैद्यकीय सामान आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची सेवा केली होती. आता कदंब महामंडळ खासगी बसेस चालवण्यास घेणार असल्याने भविष्यात नफा होऊ शकतो, असे गुदिन्हो यांनी सांगितले.
100 बसेस भंगारात
कदंबच्या 100 बसेस भंगारात काढल्या जातील. मार्चच्या अखेरपर्यंत नवीन 100 ई-बसेस येणार आहेत. पुढील महिन्यात 250 आणि सहा महिन्यांनंतर आणखी 250 ई-बसेस येणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. सध्या राज्यात ई- बसेससाठी चार्जिंग सेंटर नाहीत; परंतु त्यासाठी जागा निवडल्या आहेत, असे गुदिन्हो म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.