नगरगाव झेडपीचा माहेरी तालुक्यात सत्कार, आरोग्य मंत्र्यांची केली स्तुती!

गोमंतक धनगर मंडळाच्या शाखे तर्फे आयोजन, सभापती पाटणेकराची उपस्थिती.
नगरगाव झेडपीचा माहेरी तालुक्यात सत्कार, आरोग्य मंत्र्यांची केली स्तुती!
Dhangar Festival Program Dainik Gomantak

पिसुर्ले : सत्तरी तालुक्यातील नगरगाव जिल्हा पंचायत मतदार संघात ओबिसी राखीव गटातून (OBC reserve group) गेल्या वर्षी संपन्न झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या मलपण येथिल राजेश्री काळे यांचा डिचोली तालुक्यातील धनगर समाज उन्नती मंडळाने आयोजित केलेल्या धनगर महोत्सव कार्यक्रमात (Dhangar Festival Program) सत्कार करण्यात आला. सदर जिल्हा पंचायत सदस्या या डिचोली (Bicholim) तालुक्यातील मुळगाव येथिल मुलगी असल्याने त्याची दखल घेऊन मंडळाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Dhangar Festival Program
...तर तृणमूल पक्षाकडून मुख्यमंत्रीपदी महिला!

यावेळी सत्काराला उत्तर देताना जिल्हा पंचायत सदस्या (District Panchayat Member) राजेश्री काळे यांनी मनोगत व्यक्त करताना आरोग्य मंत्री (Minister of Health) विश्वजीत राणे यांनी आपल्यावर विश्वास ठेवून भाजपची उमेदवारी दिली, त्यामुळे आपण आज सामान्य घराण्यातील मुलगी एवढ्या मोठ्या पदावर पोचू शकले, त्याच प्रमाणे आपणाला निवडून देण्यास माझ्या कुटुंबातील सदस्यांचा तसेच सत्तरी तालुक्यातील तमाम धनगर समाज बांधवांचा खारीचा वाटा आहे. त्यामुळे धनगर समाजातील सुशिक्षित युवा पीढीने शिक्षणाला प्राधान्य देताना आपल्या भल्यासाठी चांगल्या राजकीय माणसाला साथ द्यावी असे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर डिचोली मतदार संघाचे आमदार तथा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, माजी आमदार नरेश सावळ, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, गोवा धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बि डी मोटे, उन्नती मंडळ केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष गंगाराम वरक, सचिव दिपक लांबोर, सांगे शाखेचे अध्यक्ष बाबु रेखडो, लाटंबार्से पंचायतीचे उपसरपंच यशवंत वरक, डिचोली तालुका धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप वरक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com