Goa Crime: हळदोणा येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अज्ञातावर गुन्हा दाखल

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशिल
ATM
ATMDainik Gomantak

हळदोणा येथे अज्ञाताने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. संशयिताने चोरीचा प्रयत्न केला आहे की, खोडसाळपणाने हे कृत्य केले आहे. याचा तपास पोलिस घेत आहेत. कारण अज्ञाताने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पैसे पळवलेले नाहीत. हा प्रकार आज पहाटे 3 ते 3.30 या दरम्यान घडला आहे.

(Theft attempt at ATM fails an unknown person breaks the SBI ATM at Aldona)

हळदोणा येथील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञाताने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. संशयिताने एटीएममध्ये मोठा दगड घेऊन जात ते फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटिव्ही फुटेजवरुन स्पष्ट होते आहे. यात एटीएम मशीनची काच फोडली आहे, मात्र पैसे न घेता तो निघून गेल्याने हा खोडसाळपणा आहे की, एटीएम फोडण्याचा हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ATM
No Leaves to Goa Police : इफ्फीच्या काळात गोवा पोलीस 'ऑन ड्युटी'; रजा मिळणार नाही

यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले की, हळदोणा येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनला एका अज्ञात व्यक्तीने दगडाच्या सहाय्याने नुकसान पोहचविले आहे. याप्रकरणी बँक मॅनेजर ए. दिवाकर राव यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविला आहे.

लाल रंगाचे कपडे परिधान केलेली एक व्यक्ती एटीएम मशीन कक्षात येऊन मोठा दगड या एटीएम मशीनवर मारताना दिसतेय. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, संबंधित लवकरच हाती लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकारात एटीएम मशीनचे नुकसान झाले असून, पैसे हे सुरक्षित आहेत, असे स्पष्टीकरण उपअधीक्षक दळवी यांनी दिले आहे.

ATM
Yuri Alemao: युरी आलेमाव यांच्याकडून कालवे, जलकुंभांची पाहणी

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशिल

गोवा राज्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी पुढील काही दिवसात ऑनलाईन अॅपवर तक्रारीसाठी उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी नुकतीच दिली आहे. प्रशासनाला राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठीचा असल्याने हा त्यापैकी एक प्रयत्न सुरु.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com