Goa Express: कष्टाच्या कमाईवर भामट्यांचा डल्ला, 8 कामगारांना ट्रेनमध्ये चॉकलेट देऊन ट्रेनमध्ये लुटले

गोव्यातील काम संपल्‍यावर मध्‍यप्रदेश राज्‍यातील आपल्‍या गावात जाण्‍यासाठी ते रेल्वेत चढले, पण यावेळी त्‍यांना चार भामटे भेटले.
Goa Expresss Theft
Goa Expresss Theft

Goa Expresss Theft: सोमवारी निझामुद्दीन एक्‍सप्रेसमधून प्रवास करताना गुंगीचे औषध असलेली चॉकलेटस्‌ खाऊ घालून ज्‍या आठ कामगारांना लुटण्‍यात आले ते गोव्‍यात रस्‍त्‍याच्‍या कामासाठी एका कंत्राटदाराकडे आले होते. काम संपल्‍यावर मध्‍यप्रदेश राज्‍यातील आपल्‍या गावात जाण्‍यासाठी ते रेल्वेत चढले, पण यावेळी त्‍यांना चार भामटे भेटले.

गोड गोड बोलून त्‍यांनी त्‍या कामगारांना गुंगीचे अंश असलेले चॉकलेटस्‌ आणि चिप्‍स खायला दिले आणि गोव्‍यात येऊन ज्यांनी कष्‍टाने कमाई केली होती, ती सर्व त्या भामट्यांनी लुटली

Goa Expresss Theft
International Coastal Clean-up Day: मिरामार बीचवर खासदार नाईक यांचा स्वच्छता कार्यक्रमात सहभाग, गोयकरांना आवाहन

अजय प्रताप पालवी (23), पुष्पेंद्र रामकिशोर राजक (19), कृष्णा मन्साराम (18), ओमप्रकाश मुन्शी (18), आकाश श्रवण पालवी (18), शिवा चोंगेलाल पालवी (18), विकास श्रावण पालवी (21), कृष्णा पालवी (18) अशी या लुटल्या गेलेल्या आठ कामगारांची नावे आहेत.

सर्व मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील आहेत. गुन्हेगार त्यांच्याकडील रोख रक्कम, सामान आणि मोबाईल घेऊन पळून गेले. सर्व आठजण गुरुवारी संध्याकाळी गोवा एक्सप्रेसने त्यांच्या गावी रवाना झाले.

वास्काेहून निजामुद्दीनला निघालेल्या गोवा एक्सप्रेसमधील एका जनरल बोगीतील आठ प्रवासी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळून आल्यानंतर खळबळ माजली होती. ही घटना 11 सप्टेंबर रोजी घडली होती. यानंतर मध्य प्रदेशातील त्या आठ मजुरांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गुरुवारी रुग्णालयातून त्यांना उपचारानंतर सोडण्यात आले. कामगारांना सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार गंभीर होते. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, तर इतरांवरही योग्य उपचार करण्यात आले. त्या सर्वांची प्रकृती सध्या चांगली असून त्यांना इस्पितळातून सोडण्यात आले आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले.

या प्रकरणी राजसिंग लक्ष्मीप्रसाद खंगार (18) यांनी बेळगाव रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा गोवा हद्दीत घडल्याने बेळगाव रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण गोवा रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे.

आता गोवा रेल्‍वे पोलिस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. कामगार त्यांच्या मूळ गावी परतत असताना एक वेगळीच भीती त्यांच्यात दिसत होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगार रेल्वेची साखळी ओढून सावर्डे स्थानकात उतरले असावेत अशी शक्‍यता त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

...त्यानंतर लगेचच आम्ही बेशुद्ध झालो

यासंबंधी माहिती देताना अजय पालवी या कामगाराने त्‍या दिवशी काय झाले त्‍याची माहिती दिली. तो म्‍हणाला, ‘वास्को येथे रेल्वेच्या सर्वसाधारण बोगीत आम्ही चढलो. त्यावेळी त्या भामट्यांनी आमच्याशी जवळीक निर्माण केली.

तेही मध्यप्रदेशला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेली चॉकलेट आणि चिप्स आम्ही नाखुषीने त्यांनी आग्रह धरल्यावरच खाल्ली. त्यानंतर दिलेले पाणीही प्यायलो. त्यानंतर लगेचच आम्ही बेशुद्ध पडलो, काय झाले ते कळले नाही.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com