दोन्ही कुटुंब फिरण्यासाठी गेले आणि चोरटयांनी साधला डाव

UNI
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

आके - मडगाव येथील पॅराडाईस अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून अज्ञान चोरट्यांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सासष्टी - आके - मडगाव येथील पॅराडाईस अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून अज्ञान चोरट्यांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या अपार्टमेंटच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असून पोलिस त्‍याचा वापर करून चोरट्यांचा शोध घेत आहेत. ही घटना काल मध्यरात्री घटली. 

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. पहिल्या मजल्यावर राहणारे जेम्स परेरा हे कुटुंबासह फिरण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळी घरी पोहोचल्यावर त्यांना चोरी झाल्याचे कळाले. दुसऱ्या मजल्यावर राहणारे विष्णू भट व त्यांचे कुंटुंबही फिरण्यासाठी गेले आहेत. 

मुख्‍य दरवाजा फोडून चोरी
चोरट्यांनी दोन्ही फ्लॅटांचा मुख्य दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला व जेम्स यांच्या फ्लॅटमधून १ लाख ५० हजारांचा ऐवज, तर विष्णू भट यांच्या फ्लॅटमधून ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यानी अंगठ्या, ब्रेसलेट, कर्णफुले व रोकड मिळून एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा हा ऐवज आहे. जेम्स यांनी सकाळी तक्रार नोंद केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. चोरट्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या असून त्यानुसार पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या