खनिज मालाच्या चोरी प्रकरणी तपास केला नाही तर........

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

वास्को येथील मुरगाव बंदरातून खनिज मालाच्या कथित चोरी केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी आज शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) मुरगाव पोलिसांकडे पुराव्यानिशी तक्रार केली आहे.

मुरगाव: वास्को येथील मुरगाव बंदरातून खनिज मालाच्या कथित चोरी केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी आज शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) मुरगाव पोलिसांकडे पुराव्यानिशी तक्रार केली आहे. संशयितांविरुद्ध राष्ट्रीय संपत्तीची मुरगाव बंदरातून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत संकल्प आमोणकर यांनी संशयित कोडी रिसोर्सचे श्रीनाथ पै, संशयित एम एन कन्स्ट्रक्शनचे मिलिंद नाईक, संशयित एमपीटीचे चेअरमन आणि खाण संचालक तसेच इतरांचा समावेश केला आहे. या कथित चोरीप्रकरणी सर्वांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी मुरगाव पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्याकडे केली. तसेच मुरगाव बंदरात सुरू असलेल्या या प्रकरणाकडे खाण खातेही डोळेझाक करत असल्याने त्यांनी काँग्रेस युथ कार्यकर्त्यांसह खाण खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता.

पुराव्‍यानिशी लेखी तक्रार
शुक्रवारी सकाळी काँग्रेस नेते संकल्प आमोणकर, शंकर पोळजी, सचिन भगत, उमेश मांद्रेकर, जयेश शेटगांवकर, समीर खान, महेश नाईक यांनी मुरगाव पोलिस निरीक्षक परेश नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार संकलित केलेल्‍या पुराव्यानिशी सादर केली. मुरगाव बंदरात राष्ट्रीय संपत्ती असलेल्या खनिज मालाची कथित चोरी झाली आहे. त्यामुळे संबंधित संशयितांवर भा. दं. सं.च्या १५४ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्री. आमोणकर यांनी यावेळी केली. श्री. आमोणकर यांचे म्हणणे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी ऐकून घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय आणि तपास करू, असे आश्वासन श्री. आमोणकर यांना दिले.

खनिज मालाच्या चोरी प्रकरणी तपास केला नाही, तर न्यायालयात जाऊ असा इशारा श्री.आमोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आपण जी कथित चोरी उघडकीस आणली आहे त्यात तथ्य आहे. जर यात आपण खोटे ठरलो, तर राजकारण संन्यास घेऊ, असे श्री. आमोणकर यांनी जाहीर केले.
दरम्यान, मुरगाव बंदरातील खनिज माल अन्‍य मार्गाने जहाजात भरल्‍याचा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला. ते जहाज खनिज घेऊन परदेशात जाण्याच्या तयारीत आहे, याची दखल पोलिसांनी 

संबंधित बातम्या