Goa Crime : महागड्या वस्तूंसह विदेशी चलनाची चोरी; कर्नाटकातील व्यक्तीला गोव्यात बेड्या

3 लॅपटॉप, 2 मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि 2 लाख रुपयांचे विदेशी चलन हस्तगत
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

गोव्यात वारंवार चोऱ्यांचे सत्र सुरूच असून यात परप्रांतीय व्यक्तींचा हात असल्याचे पोलीस तपासात उडत झालंय. राजधानी पणजी लगतच्या पर्वरी भागात पोलिसांनी एका व्यक्तीला चोरी करताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. मणिकांत डी. ए. (मूळ रा.शिमोगा, कर्नाटक) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 3 लॅपटॉप, 2 मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि 2 लाख रुपयांचे विदेशी चलन हस्तगत केले आहे. माणिकांत याने पर्वरीसोबत वेर्णा येथील अपार्टमेंट आणि हॉटेलमध्येही चोरी केल्याचे पोलिसतपासात उघड झाले आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांचे सुरक्षेबाबत काम वाढले असून रात्रीच्या गस्त फेऱ्या देखील वाढवाव्या लागत आहेत. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडून सुरक्षेची खात्री असते. गोव्यात चोरीच्या घटना वाढत असून गेल्या काही दिवसांत शहर व ग्रामीण भागातही घरफोड्या व भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. पोलिस प्रशासनाने वेळीच कोणतीही मोठी उपाययोजना न केल्यास या चोरांचा उपद्रव वाढण्याची शक्‍यता आहे. यासाठी पोलिस प्रशासन कोणत्या ठोस कार्यवाहीद्वारे चोरांवर आळा घालते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Goa Crime
Goa Crime : अखेर मुसक्या आवळल्याच; चोराच्या नावावर चोरी, घरफोडीचे 48 गुन्हे!

आंतरराज्य चोरी प्रकरणांत हिटलिस्टवर असलेल्या ओडिशातील सराईत गुन्हेगार संतोष कुमार दास (42) याच्या काही महिनांपूर्वी पणजी पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. पणजी आणि पर्वरी येथे एकूण 48 घरे फोडणे, चोरी आणि दरोड्याच्या प्रकरणांमध्ये पोलिसांना तो हवा होता. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा पर्वरी भागातील चोरी प्रकरण पोलिसांनी उघड केलंय..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com