धारगळ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले

Thefts increased in Dhargal area
Thefts increased in Dhargal area

पणजी,

धारगळ पंचायत क्षेत्रात टाळेबंदीच्‍या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परप्रांतीय मजूर आपापल्‍या गावी रवाना झाले, तरीही चोऱ्यांचे सत्र काही थांबेना. चोऱ्या झाल्‍या की, परप्रांतीयांवर आरोप केला जात होता. आता टाळेबंदी कालावधीत चोरट्यांकडून मोबाईल, महागडे कॅमेरे, लॅपटॉप यासह अन्‍य महागड्या वस्‍तू लंपास करण्‍याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत पोलिस तक्रार केल्‍यानंतर तपास सुरू आहे, यापलीकडे काहीच माहिती दिली जात नाही. टाळेबंदीत व्‍यस्‍त असल्‍याने काय करणार? अशी हतबलता पोलिसांकडून व्‍यक्‍त केली जात असल्‍याच्‍या आरोप स्‍थानिकांकडून केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी साळगावकर नामक व्‍यक्‍तीच्‍या घरात चोरी झाली. त्‍यांच्‍या घरातील मोबाईल, कॅमेरे व लॅपटॉप चोरीला गेला. यासंदर्भात पोलिस तक्रारही नोंदवण्‍यात आली. त्‍यांनाही तपास सुरू असल्‍याचे सांगितले जात आहे. अशाच प्रकारे चोरट्यांनी इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंची चोरी करण्‍याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. गेल्‍या वर्षी धारगळ येथील बँकांची दोन्‍ही एटीएम यंत्रणा फोडून पैसे लंपास केले होते. त्‍याचा अद्याप तपास सुरू आहे. कोलवाळ, मोरजी परिसरातही एटीएम यंत्रणा फोडली व यंत्रणा कक्षातून हलवून वाहनाद्वारे निर्जनस्‍थळी नेऊन फोडण्‍यापर्यंत मजल गेली
होती. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com