Pramod SawantNight Curfew

Pramod Sawant

Night Curfew

Dainik Gomantak

....तर राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ लावावा लागेल: मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘नाईट कर्फ्यू’चे निर्बंध लदण्याची शक्यता वर्तवली आहे.

पणजी: सध्या गोव्यामध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची ये-जा वाढली आहे. या सणासुदीच्या दिवसात गोव्याच्या सर्व कानाकोपऱ्यांमद्धे पर्यटकांची व स्थानिकांचा वावर वाढत आहे. यामुळे ओमिक्रॉन संसर्गाचा धोका देखील वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘नाईट कर्फ्यू’चे निर्बंध लदण्याची शक्यता वर्तवली आहे.

Pramod Sawant

Night Curfew

गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचे अलगीकरण सक्तीचेच!

राज्यात कोरोना (Corona) संक्रमण दर 1.8 वरून 3.5 असा दुप्पट झाला आहे. सध्या गोव्यात असलेल्या साडेतीन हजार विदेशी नागरिकांची अजून दुसरी आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी झालेलीच नाही, त्यामुळे चिंता वाढली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

राज्यात अजून ओमिक्रॉनचा (Omicron-variant) रुग्ण सापडलेला नाही. ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी पाठवलेले 19 नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयए) गेल्या 15 दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासाठी जीनोम सीक्वेन्सिंग मशीनची आवश्यकता असते. देशात काही ठिकाणीच ही सोय आहे. हे मशीन लवकरच राज्यात आणले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ओमिक्रॉनचा प्रसार टाळण्यासाठी आरोग्य विभाग, पर्यटन विभाग आणि जिल्हाधिकारी एकत्र येऊन सोमवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करतील. ती अनिवार्य असतील.

केंद्र सरकारने सूचना जारी केल्या

केंद्र सरकारने (Central government) ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सोमवारी कोरोनाशी संबंधित तज्ज्ञ समितीची बैठक होईल. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार काही बदल करण्यात येतील. तर बुधवारी कृती दलाची बैठक होईल आणि बैठकीत ठरल्यानुसार पुढील आदेशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राज्यात पर्यटन हंगाम सुरू झाला असून सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांची ये-जा वाढणार आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महामारीविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मात्र, कोरोना संक्रमणाचा दर वाढल्यास ‘नाईट कर्फ्यू’ (Night Curfew) सारखे निर्बंध आणावे लागतील.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Pramod Sawant

Night Curfew

‘त्या’ आमदाराला विधानसभेतून बडतर्फ करा: बीना नाईक

गोव्यात ध्वनिक्षेपकावर रात्री 10 नंतर निर्बंध

नववर्ष (New Year) स्वागतासाठी गोव्यात सध्या मोठ्या प्रमाणात धामधूम सुरू आहे. नववर्षाच्या पूर्वरात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करत संगीत रजनी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक वापरावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बंदी घातली आहे. या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे व उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी गस्त घालण्याच्या सूचना केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com