‘पर्यटन धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी विश्‍वासात घ्या’: पर्यटन व्यावसायिक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारने अनेक वर्षांच्या चर्चेनंतर पर्यटन धोरण निश्चित केले आहे. यंदाचा पर्यटन हंगाम यथातथाच असताना पर्यटन धोरणाच्या अंमलबजावणीस खो बसण्याची चिन्हे आहेत.

पणजी: राज्य सरकारने पर्यटन धोरण निश्चित केले असले, तरी त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्या असे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने अनेक वर्षांच्या चर्चेनंतर पर्यटन धोरण निश्चित केले आहे. यंदाचा पर्यटन हंगाम यथातथाच असताना पर्यटन धोरणाच्या अंमलबजावणीस खो बसण्याची चिन्हे आहेत.

द ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, भारतीय उद्योग महासंघाची राज्य शाखा यांनी एकत्रितपणे आमचेही म्हणणे ऐकून घ्या अशी मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवले आहे. पर्यटन व्यवसायात सर्व संबंधित घटकांना समान न्याय  व वाटा मिळाला पाहिजे असे या संघटनांचे म्‍हणणे आहे.

यासाठी सरकारने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पर्यटन व्यवसायाला दिशा देण्यासाठी गेल्या महिन्यात सरकारने पर्यटन धोरण निश्चित केले आहे. त्यानंतर आता या संघटनांनी या धोरणाविषयी संशय घेत ही मागणी केली आहे. आमचे म्हणणे जाणून घेतल्याशिवाय धोरणाची अंमलबजावणी नको असे या संघटनांनी स्पष्ट केले आहे.
 

संबंधित बातम्या