मडगाव बाजारात फळभाजी मुबलक, पण बिस्किटंच गायब

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

वाढत्या कोविड संसर्गामुळे सरकारने कर्फ्यू व अन्य निर्बध लागू करून आठवडा होत आला तरी खरेदीसाठी निर्बधित वेळेत लोकांची गर्दी होत आहे तर दुसरीकडे अनेक नित्याच्या वस्तू बाजारात मिळेनाशा झाल्या आहेत त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. प्रमुख कंपन्यांच्या बिस्किटस्,  चॉकलेटस् व दूध आदींना मोठी मागणी आहे. 

मडगाव: वाढत्या कोविड(Covid-19) संसर्गामुळे सरकारने कर्फ्यू व अन्य निर्बध लागू करून आठवडा होत आला तरी खरेदीसाठी(Marketing) निर्बधित वेळेत लोकांची गर्दी होत आहे तर दुसरीकडे अनेक नित्याच्या वस्तू बाजारात मिळेनाशा झाल्या आहेत त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. प्रमुख कंपन्यांच्या बिस्किटस्,(biscuits) चॉकलेटस् व दूध आदींना मोठी मागणी आहे.(There is fruit and vegetables in Margao market but only biscuits are missing)

काळोखाचे तास: गोमॅकोत ऑक्सिजन अभावी 75 रूग्णांचा बळी 

स्वीट मार्ट चालू आहेत पण घरगुती शेव, चिवडा व फरसाण या वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत, त्याचप्रमाणे विविध कंपनीच्या बिस्कीटस्, टोस्ट मिळेनासे झाले आहेत. विक्रेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, संबंधित कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. शहरातील बागायतदार बाजार, सहकार भांडार येथेही हीच गत आहे.

गोव्यातील मुख्‍यमंत्री-आरोग्‍यमंत्री यांच्यातील वाद ‘संतोष’रुपी मध्‍यस्‍थीने मिटला 

निर्बंधीत वेळेत व्यवहार होत असल्याने वस्तू पॅक करून दालनात दाखल करणे शक्य होत नाही व त्यामुळे संबंधित वस्तूंचे खण रिकामेच दिसतात. मात्र याला अपवाद भाजी व फळे व तत्सम जिनसांचा तसेच मासळी व मांसाचा आहे. भल्या पहाटे हे स्टाल खुले होतात.

 

संबंधित बातम्या