गोवा मुक्तिदिनी आरोग्य खात्याने दिली दिलासादायक बातमी

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

आज राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शून्य होता. गोवा मुक्तिदिनी ही दिलासादायक बातमी आरोग्य खात्याने दिली आहे.

पणजी: आज राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शून्य होता. गोवा मुक्तिदिनी ही दिलासादायक बातमी आरोग्य खात्याने दिली आहे. दरम्यान, आजच्या दिवशी १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर ११० रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे आहे. आज १ हजार ६९० जणांच्या नमुण्यांची चाचणी करण्यात आली.

२५ जणांना आरोग्य खात्याने घरगुती विलगीकरणात राहून उपचार घेण्यास परवानगी दिली आहे. २९ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४९ हजार ९७६ वर पोहोचली आहे. राज्यभरात ॲक्टिव पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या ९७८ एवढी असून दक्षिण गोव्यातील मडगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्वाधिक १५४ रुग्ण आहेत. इतर शहरांच्या व ग्रामीण आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत ७० च्या खाली रुग्ण आहेत. उत्तर गोव्याचा विचार केला, तर सर्वाधिक रुग्ण पर्वरी (७०) आरोग्य केंद्राच्या हद्दीत आहेत.

संबंधित बातम्या