गोव्यात तूर्त लॉकडाऊन नाही मात्र...

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

गोव्यात टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याचा तूर्त विचार नाही. मात्र उद्यापासून पोलिस व महसूल अधिकारी गर्दीच्या ठिकाणी कठोर कारवाई सुरु करतील.

पणजी: गोव्यात टाळेबंदी (लॉकडाऊन) (Lockdown) करण्याचा तूर्त विचार नाही. मात्र उद्यापासून पोलिस व महसूल अधिकारी गर्दीच्या ठिकाणी कठोर कारवाई सुरु करतील. टाळेबंदी या अंतिम पर्यायाकडे जाण्यापूर्वी कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीचा पर्याय सरकार वापरून पाहणार आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज सायंकाळी उशिरा स्पष्ट केले. (There is no immediate lockdown in Goa but)

आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी कदाचित टाळेबंदी ही कोविड प्रसाराची साखळी तोडू शकेल असे ट्विट आज केले होते. अर्थचक्र सुरु राहणे महत्वाचे आहे तसेच लोकांचे जीवनही महत्वाचे आहे असे त्यांनी म्हटले होते. याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांनी ट्विट केले आहे. माझी व त्यांची भेट झालेली नाही. कोविड प्रसाराची साखळी तोडली गेली पाहिजे. यासाठी उद्यापासून लग्न समारंभ असतील वा इतर तेथे गर्दी दिसली की ते समारंभ बंद पाडले जातील आणि आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून कठोर पावले टाकावी लागतील. लोकांना ते आता अप्रिय वाटेल पण टाळेबंदी टाळण्यासाठी ते करावेच लागेल. ऩिर्बंधांचे पालन न केल्यास मग अंतिम पर्यायाचाही सरकारला नाईलाजाने विचार करावा लागणार आहे.

गोवा: खात्याअंतर्गत डीवायएसपी होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

मुख्यमंत्री म्हणाले, एका वेळी दोन हजार रुग्ण सापडू लागले आहेत कारण चाचण्यांचे निकाल येणे बाकी होते. कोविडची ही दुसरी लाट भयानक आहे. त्यामुळे जरा जरी लक्षणे दिसली तरी त्यांनी चाचणी करून घेणे आणि कोविड निगा केंद्रात दाखल होणे आवश्यक आहे. स्वतःच उपचार करून घेत घरी राहणे लोकांनी बंद केले पाहिजे. त्यातूनच मृत्यू दर वाढत असल्याचे दिसते. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, म्हापशाचे उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ, मडगावचे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, फोंड्याचे उपजिल्हा इस्पितळात खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. वैद्यकीय प्राणवायूची (मेडिकल ऑक्सिजन) (Oxgen) सर्वत्र पुरेशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सरकारने आपल्या परीने सारी तयारी केली असली तरी उपचार करून घेण्यासाठी जनतेने पुढे येणे जरुरीचे आहे.

Goa Municipal Election 2021: म्हापसा पालिका निवडणूकीतील विजयी उमेदवारांची यादी...

शेजारील महाराष्ट्र (Maharashtra) व कर्नाटकाने (Karnatak) टाळेबंदी केल्याकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, सगळ्या परिस्थितीवर सरकार नजर ठेऊन आहे. राज्यातील कोविड प्रसाराची आणि मृत्यू दर वाढण्याची परिस्थिती कायम राहिली तर कडक उपाय योजावेत लागणार आहेत. उद्यापासून कडक अंमलबजावणी होते म्हणून जनतेने तक्रारी करत बसू नये. सध्याची परिस्थिती काय आहे हे समजून घ्यावे व सरकारला सहकार्य करावे. विनापरवाना कार्यक्रम तत्काळ बंद करण्याचे आदेश पोलिस व महसूल यंत्रणेला दिले आहेत.

संबंधित बातम्या