गोव्यातील करदात्यांना दिलासा: पाच वर्षे कर शुल्कात कोणतीही वाढ नाही

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

कर आणि शुल्कामध्ये अन्यायकारक वाढ करण्याच्या विरोधात शॅडो कौन्सिल फॉर मडगाव नेहमीच आवाज उठवित आले आहे.

मडगाव: कर आणि शुल्कामध्ये अन्यायकारक वाढ करण्याच्या विरोधात शॅडो कौन्सिल फॉर मडगाव नेहमीच आवाज उठवित आले आहे. आगामी 5 वर्षांत कोणत्याही प्रकारच्या कर आणि शुल्कामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. अतिरिक्त अनुदानाची पूर्तता करण्यासाठी घरपट्टीविना असलेली घरे आणि व्यापार परवान्याविना व्यावसायिक आस्थापनांना कर लागू करून महसूल गोळा केला जाईल, असे सिटीझन्स चॉईस पॅनेल मडगावकरांना आश्वासन देत असल्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे.‘सिटीझन चॉईस पॅनेल फॉर एमएमसी’ नावाच्या नागरिकांच्या पॅनेलने शॅडो कौन्सिल फॉर मडगाव, सिटीझन्स फॉर सोनसोडो आणि गोवा विथ लव्ह या संस्थेने आपला जाहीरनामा जनरल व्हिजन डॉक्युमेंटच्या रूपात, गोव्याच्या व्यावसायिक राजधानीसाठी जाहीर केला. (There is no increase in tax charges for five years In Goa)

''मुरगावातील जनता भाजपच्या उमेदवारांना विजयी करेल''

आज झालेल्या पत्रकार परिषदेत, कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले की, त्यांचे पॅनेल जाहीरनामा अत्यंत तपशीलवार आहे आणि त्यांचे पॅनेल निवडल्यास मंडळ त्या संबंधीत सर्व बाबींचा समावेश करेल. त्यांच्या प्राधान्यक्रमांच्या यादीमध्ये, पॅनेल जुन्या फिश मार्केटमध्ये बेलींग ऑपरेशन्सद्वारे तयार केलेला घोळ त्वरित सोडवून त्याच ठिकाणी मल्टी लेव्हल पार्किंग सुविधा त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन देते असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सोनसोडो येथे बायो रेमेडिएशनच्या कामांचे श्रेय घेण्याच्या विचारसरणीच्या सर्व राजकारण्यांच्या दावे फेटाळताना पॅनेलने म्हटले आहे की लॅगसी डंपवरील काम पूर्णपणे सिटीझन फॉर सोनसोडो समूहाने केलेल्या याचिकेमुळे होत आहे आणि त्याद्वारे हा कचरा हटविला जाईल, असे आश्वासन दिले.  वर्गीकरण केलेला कचऱ्यासाठी (काचेच्या साहित्यांसह) एक अत्यंत प्रभावी प्रणाली स्थापित करण्याचे आश्वासन देताना १२ महिन्यांच्या आत सर्व बाबी जागेवर घालण्यात येईल.

भटकी कुत्रे व गुरे समस्या, सर्व खुल्या नाल्यांना फरशा, वाहतुक सुरळीत करण्यासाठी रिंगरोड त्वरित पूर्ण करणे आणि शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, विस्थापित गाड्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन,  आरोग्यदायी सार्वजनिक शौचालये उपलब्ध करुन देणे व सध्याच्या सुविधा राखणे यासारख्या बाबींचा जाहिरनाम्यात समावेश आहे.  
ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षण याखाली हेरिटेज ''काम्र'' इमारत आणि दिवंगत डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स घर या प्रलंबित दुहेरी प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्याचा पॅनेलचा विचार आहे. पालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कॉमन कॅडरच्या अंमलबजावणीचीही दखल घेतली जाईल आणि गरज भासल्यास कायदेशीर पर्यायांचा शोध घेण्यात येईल, असे कुतिन्हो यांनी आश्वासन दिले आहे.  फातोर्डा आणि मडगाव येथे सायकल ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांना मडगाव आणि फातोर्डा येथे उद्याने आणि संपूर्ण माडगाव व फातोर्डा मधील वाय-फाय हॉटस्पॉट्स देखील या जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत.

गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट

पालिकेचे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि कारभार, नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी नागरिक तक्रार कक्ष स्थापन करू. सेवांचे विकेंद्रीकरण करून आम्ही वेळेवर सेवा देण्यासाठी आणि यंत्रणा तयार करण्यासाठी आणि पालिकेच्या सर्व मूलभूत सेवा नागरिकांच्या दारात देऊ शकू असे नमूद केले आहे. आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पॅनेल सर्व नगरसेवक, अगदी कंत्राटी कामगारांसाठी बूट, हातमोजे, हेल्मेट्स, मास्क, चेहरा-शील्ड सारख्या संरक्षक गियर देण्याचे आश्वासन दिले. शेतीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नातून आम्ही स्थानिक आणि गोमंतकीय कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा शोधून काढण्याचे ठरविले आहे.  बियाणे, खत व इतर शेतीची साधने उपलब्ध करून देऊन कृषी व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचे काम करणार. विद्यमान गटारांची साफसफाई व देखभाल दर वर्षाच्या १५  मेपर्यंत पूर्ण केली जाईल, तर तण काढणे दरवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले जाईल. पर्यटनाला चालना देण्यात येईल. आजवर कोणत्याही राजकारणी किंवा नेत्याचे लक्ष वेधून घेतलेले मालमत्ता व्यवस्थापन नागरिकांच्या समितीने लक्ष दिले आहे.  जाहिरनामा प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमात रॉक मास्कारेन्‍हास, ओर्लांडो पाशेको, गर्सन गोम्स, प्रभाग २० मधील उमेदवार पोमा केरकर आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या