गोव्यात नवा मोटर वाहन कायदा नाहीच

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

केंद्र सरकारने दुरूस्ती केलेला नवा मोटर वाहन कायदा गोव्यात लागू करण्याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोणतीही चर्चा झाली नाही,

पणजी: केंद्र सरकारने दुरूस्ती केलेला नवा मोटर वाहन कायदा गोव्यात लागू करण्याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोणतीही चर्चा झाली नाही,असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे पत्रकारांना सांगितले. नव्या वर्षापासून हा कायदा गोव्यात लागू केला जाईल अशी चर्चा होती. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनीही तसे सांगितले होते, मात्र आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याविषयी चर्चा झाली नाही. 

गोवा सरकारने सामाजिक जबाबदारींतर्गत  सामाजिक कामे करण्यासाठी एका नव्या कंपनीची स्थापना करण्याचे ठरवले आहे.  मुख्यमंत्र्यांनी सांगितले सध्या केवळ आपत्तीच्या कामासाठीच सरकार कंपन्यांकडून पैसे घेऊन जनतेला मदत देऊ शकते, मात्र इतर प्रकल्पांना देण्यासाठी अशा कंपनीची गरज होती. महाराष्ट्र,गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यात अशा कंपन्या राज्य सरकारांनी स्थापन केलेल्या आहेत. वेर्णा येथे वैद्यकीय निर्मिती उद्यान तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

संबंधित बातम्या