पर्यटक शासकीय चाचणी केंद्राला माहिती देणार कोण? गोवा पर्यटकांची उडाली धांदल

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

राज्यात आलेल्या पर्यटकांची चांगलीच धांदल उडाली आहे. पण काही पर्यटक जेव्हा सरकारी टेस्टिंग सेंटरला माहिती घेण्यासाठी जात आहेत तेथे मात्र माहिती द्यायला कोणीच नाही.

पणजी: गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांना आता आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात आलेल्या पर्यटकांची चांगलीच धांदल उडाली आहे. पण काही पर्यटक जेव्हा सरकारी टेस्टिंग सेंटरला माहिती घेण्यासाठी जात आहेत तेथे मात्र माहिती द्यायला कोणीच नाही.

जे लोक आज परतणार आहेत ते ठिकठिकाणी कोरोना चाचणीबाबतची माहिती गोळा करून घेताना दिसून येत आहेत. खासगी लॅबमध्ये अनेक लोक चाचणी करण्यासाठी जात असले तर चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागत असल्याने ज्यांच्या फ्लाईट आज आहेत, ते संभ्रमात आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत असल्याने लोकांची धांदल उडत आहे. पुन्हा पूर्ण लॉकडाऊन होईल, अशी भीती निर्माण झाल्याने काहींनी परतीचा प्रवाससुद्धा सुरू केला आहे. दरम्यान पर्यटकांची धांदल उडाली असतांना काही ठिकाणच्या सेटरला माहिती द्यायला कोणीच उपलब्ध नाही, असे चित्र दिसून आले.

जे लोक येत्या काही दिवसात परतणार आहेत, त्यांनी स्वतःची चाचणी करण्यासाठी नंबर लावला आहे. काहींची अवस्था उगाचच गोव्याला आलो अशी झाली आहे. हि चाचणी नसेल तर महाराष्ट्रात पोहचल्यावर त्यांना स्वखर्चाने चाचणी करावी लागणार आहे शिवाय जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर उपचारासाठी कोरोना केअर सेंटरमध्ये जावे लागणार आहे.

संबंधित बातम्या