ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव नाही - मंत्री जेनिफर मोन्सेरात 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

राज्यातील अकरा पालिका निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांबरोबर पणजी महापालिकेची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पणजी: राज्यातील अकरा पालिका निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांबरोबर पणजी महापालिकेची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याबाबतची चर्चा होत असून त्याबाबत वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

या वृत्तामुळे ताळगाव पंचायत क्षेत्रातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. या विलिनीकरणाबाबत कोणताच निर्णय झाला नसला तरी ताळगाववासीयांमध्ये याबाबत संशय निर्माण झाला आहे. ताळगावचे माजी मंत्री व माजी आमदार सोमनाथ जुआरकर यांनी ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन केली होती तेव्हा लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उठली होती. त्याच काळात अतानासिओ ऊर्फ बाबुश मोन्सेरात यांनी विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच लढवताना ही ताळगाव पंचायत पुन्हा जैसे थे करण्याचे आश्‍वासन दिले होते. आमदार निवडून आल्यावर त्यांनी दिलेले वचन पाळले व पुन्हा ताळगाव पंचायत अस्तित्वात आली. पुन्हा हालचाली सुरू झाल्याने लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ताळगावच्या आमदार व मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी फेसबुकवरून माहिती देताना ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्‍ट केले आहे.

आणखी वाचा:

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना दिल्लीला हलवणार नाही ; एम्सच्या तज्ज्ञांची माहिती -

संबंधित बातम्या