राज्यात वैद्यकीय सुविधांची कमतरता नाही : प्रमोद सावंत  

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि आणि मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालय प्रशासननांना मुख्यमंत्री प्रमोद  सावंत यांनी रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पणजी : गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि आणि मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालय प्रशासननांना मुख्यमंत्री प्रमोद  सावंत यांनी रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे गंभीरपणे घ्यावीत, रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय सेवा दिली जावी, असे आवाहन प्रमोद सावंत यांनी केले आहे. तसेच, राज्यात वैद्यकीय सुविधांची कमतरता नसल्याचे आश्वासनही यावेळी प्रमोद सावंत यांनी दिले आहे. (There is no shortage of medical facilities in the state: Pramod Sawant) 

गोवा-महाराष्ट्र सीमा  बंद; रॅपिड अॅंटीजेन चाचणी मात्र अनिवार्य 

सोमवारी गोव्यात कोरोनामुळे 17 तर मंगळवारी 26 कोरोना बंधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात विषाणूजन्य संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या 900 पर्यंत वाढली आहे.  राज्यात सोमवारी 940 आणि मंगळवारी 1160 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 69312 वर पोहचली आहे. त्यानंतर आता राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 8241 इतकी झाली आहे. 

तथापि, राज्यातील कोरोना परिस्थितीवर प्रमोद सावंत यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. ''कोविड- 19 मुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. यात घटनांमधील बहुतांश मृत्यू रुग्णाला रुग्णालयात उशिरा दाखल झाल्यामुळे झाल्याचे आढळून आले आहे. म्हणूनच, मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की साधी लक्षणेदेखील गंभीरपणे घ्यावीत आणि  लक्षणे आढळून आल्यास लगेचच जवळच्या नजीकच्या रुग्णालयात तपासणी करून घ्या.  आपल्या राज्यात वैद्यकीय सुविधांची व तज्ञांची कोणतीही  कमतरता नाही. वैद्यकीय सेवा घेण्यास  उशीर केल्याने केवळ बरे होण्याची शक्यता कमी हॉट जाते,  असेदेखील प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 

संबंधित बातम्या