प्रचारात विद्वेष असू नये : राजनाथसिंह

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

लोकांमध्ये विद्वेष पसरवून निवडणूक लढविल्या आणि जिंकल्या जाऊ नयेत, सुदृढ लोकशाहीत अपमानाला आणि कटू बोलांना कोणतेही स्थान नसावे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.

पाटणा : लोकांमध्ये विद्वेष पसरवून निवडणूक लढविल्या आणि जिंकल्या जाऊ नयेत, सुदृढ लोकशाहीत अपमानाला आणि कटू बोलांना कोणतेही स्थान नसावे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजनाथ म्हणाले की, प्रचारादरम्यान वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. बरेच राजकीय नेते द्वेषमूलक भाषण करत असल्याबद्दल आणि वैयक्तिक टीकाटिपण्णी करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

संबंधित बातम्या