शेळ मेळावलीत अश्रुधुराचा वापर

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

मेळावलीत आयआयटी प्रकल्प विरोधात आज दुसऱ्या  दिवशीही तणावाचे वातावरण होते.

वाळपई: मेळावलीत मुरमुणे येथे आज मोठा पोलीस फाटा तैनात होता. सर्वेक्षण करण्यासाठी सरकारी अधिकारी येत असल्याची लोकांना चाहूल लागताच लोकांनी जंगलात काजू क्षेत्रात डोंगरावर धाव घेतली . तिथे बरीच चकमक उडाली. यात महिला पोलिस जखमी झाल्या आहेत.

मेळावलीत आयआयटी प्रकल्प विरोधात आज दुसऱ्या  दिवशीही तणावाचे वातावरण होते. यावेळी नागरिक व पोलीस सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. तसेच संतप्त लोकांनी दगडफेक केली. यावेळी पोलीसांनी अश्रूधुरांचा मारा केला.

यावेळी काही महिला पोलीस जखमी झाल्या, त्यांना वाळपई आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या