गोव्यात टाळेबंदी लागू करता येणार नाही
There will be no lockdown in the state of Goa

गोव्यात टाळेबंदी लागू करता येणार नाही

पणजी: कोरोना तपासणी केंद्रे वाढवण्याचे तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरणही वाढवण्या येणार असून राज्यात टाळेबंदी करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केले. 

राज्यात आज दिवसभरात कोरोनामुळे एका व्यक्तीचे निधन झाले. आज राज्यातील विविध आरोग्य केद्रांत 1618 व्यक्तीचे नमुने तपासण्यात आले त्यात 73 व्यक्ती कोरोना संसर्गित आढळल्या. आजच्या दिवसभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या 59 व्यक्ती बऱ्या झाल्या.

आजच्या एका बळीमुळे कोरोनामुळे राज्यात  मृत्यू येणाऱ्यांची संख्या 812 झाली आहे. कालच्या दिवशी चार व्यक्ती कोरोनामुळे दगावल्या होत्या.  आजच्या दिवशी राज्यातील विविध जागी कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 805 इतकी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com