Water Supply: बार्देश, डिचोली तालुक्यात तीन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

12, 18 आणि 28 ऑक्टोबर रोजी संपूर्ण बार्देश तालुका आणि डिचोली तालुक्यातील काही भागात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे.
Goa Water Supply
Goa Water SupplyDainik Gomantak

Water Supply: बार्देश आणि डिचोली (Bardez & Bicholim) तालुक्यात वेगवेगळ्या तीन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे. 12, 18 आणि 28 ऑक्टोबर रोजी संपूर्ण बार्देश तालुका आणि डिचोली तालुक्यातील काही भागात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

नव्याने आलेल्या ईलेक्ट्रो-मॅगनेटिक पाणी मीटरची चाचणी तसेच, मीटर बसवण्याचे काम केले जाणार आहे. पर्वरी (Porvorim) येथील 1000mm पाणी पुरवठा लाईन, म्हापसा (Mapusa) येथील 700mm आणि थिवी (Thivim) येथील 400mm पाणी पुरवठा लाईनवरती मीटर बसवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे 12, 18 आणि 28 ऑक्टोबर रोजी संपूर्ण बार्देश तालुका आणि डिचोली तालुक्यातील काही भागात मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे.

Goa Water Supply
Modi-Marathi Exhibition: 'मोडी'चा पुरातन ठेवा, अनेक दस्तऐवज पाहण्यासाठी उपलब्ध

दरम्यान, 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी पेडणे तालुक्यात देखील मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे. विद्युत वितरण विभागाने तांत्रिक बिघाडामूळे विज पुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे पेडणे तालुक्याला मर्यादीत स्वरुपात पाणी पुरवठा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com