Thief Arrested : मोबाईल लंपास केल्याप्रकरणी चोर गजाआड

मल्लपूरम-केरळ येथील पर्यटक मोहम्मद शामील आणि त्यांचे मित्र हणजूण येथील समुद्रकिनारी गेले असता चोरांनी त्यांचे महागडे मोबाईल लंपास केले.
Thief arrested
Thief arrested Dainik Gomantak

शिवोली : मल्लपूरम-केरळ येथील पर्यटक मोहम्मद शामील आणि त्यांचे मित्र हणजूण येथील समुद्रकिनारी गेले असता चोरांनी त्यांचे महागडे मोबाईल लंपास केले. शमील यांनी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत संशयित मोहम्मद जहीर तसेच सोहेल सुधीर या चोरांच्या मुसक्या आवळल्या.

यावेळी हणजूणचे निरीक्षक प्रशील देसाई व पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल जप्त केले. संशयितांची हणजूणच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. राज्यात सध्या चोरी-घरफोडीच्या घटना वाढत आहेत. त्यातच पर्यटकांच्या वस्तू चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वास्को मुरगाव पत्तन प्राधिकरणकडे जाताना इंडियन ऑइल कंपनीच्या गेट समोर असलेल्या वेलंकनी चर्चमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न फसला.चर्चमधील मुख्य दरवाजाबरोबर खिडक्या अज्ञात चोरट्याने फोडून चर्चमध्ये प्रवेश केला.

वास्को इंडियन ऑइल उड्डाणपुलाखाली असलेल्या वेलंकनी चर्च मध्ये अज्ञात चोरट्याने(Thieves) चोरी करण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरट्यांनी चर्चमधील खिडक्या व इतर वस्तूची नासधूस केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com